पिसाळलेल्या कुत्र्यांचा तब्बल नऊ जणांवर हल्ला : श्वानप्रेमींचे मौन

By | December 3, 2017

dog attacks citizens in nandgav nashik district

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव इथे पिसाळलेल्या कुत्र्यांने अचानक बऱ्याच नागरिकांवर हल्ला करून तब्बल नऊ जणांचे लचके तोंडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे .

पिसाळलेल्या कुत्र्यांने चावा घेतल्याने जखमी झालेल्यांमध्ये कृषी विभागातील अधिकारी वसंत नागरे यांच्या पत्नीचाही समावेश आहे तसेच बरीचशी शाळकरी मुले, महिला आणि वृद्ध मंडळीदेखील ह्या कुत्र्याची शिकार झाली. जखमी झालेल्या नागरिकांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याआधी देखील पिसाळलेल्या तसेच भटक्या कुत्राकडून माणसांवर हल्ले झाले आहेत मात्र पालिका प्रशासनाने कुत्र्यांना आळा घालण्यासाठी अजून कोणतीही उपाययोजना अद्याप केलेली नाही. रात्री आणि पहाटेच्या सुमारास हा कुत्र्यांकडून जास्त प्रमाणात हल्ले होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

आज पहाटे साडेपाच वाजता रेल्वे फाटकाजवळ लाल रंगाच्या पिसाळलेल्या कुत्र्याने आनंद नगर येथील रहिवासी जाधव यांना चावा घेतला. त्यानंतर येवला रस्त्यावरील गांधीनगर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील निखील वानखेडे (वय-27), आनंदा दाभाडे (वय-60) सकाळी फिरण्यासाठी निघालेल्या पुष्पा वसंत नागरे (वय- 40), कमलबाई यशवंत पाटील (वय-65), सारिका प्रकाश गुढेकर, शिला पोपट पवार, राजू बाबूलाल थोरात यांना चावा घेतला. त्यानंतर भोंगळे रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ राहुल संतोष पवार या १४ वर्षीय शाळकरी मुलाच्या चेहऱ्यावर चावा घेऊन जबर जखमी केले.

याआधी देखील जुलै, ऑगस्ट महिन्यात कुत्र्यांच्या झुंडीने चढविलेल्या हल्यात वयोवृद्ध महिलेसह दहा ते बारा जण जखमी झाले होते. मधल्या काळातही कुत्र्यांच्या हल्याच्या घटना घडत होत्या. सुदैवाने आजवर लहान मूल किंवा गरोदर महिला सापडलेल्या नाहीत, भविष्यात जर अशी दुर्घटना उद्भवली तर काय करायचे. त्यामुळे ह्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करायला हवा अशी मागणी आता लोक करू लागले आहेत .

पिसाळलेली कुत्री ही सर्रास दिसेल त्याला चावट सुटतात किंवा पाठीमागून हल्ला करतात . मात्र ह्यावेळी कुत्रानी चेहऱ्यावरचं हल्ला केला आहे सुदैवाने कुत्र्यांचा हल्ल्यात कुणाला आपले डोळे गमवावे लागले नाही. नागरिकांच्या जीवांची काही किंमत आहे कि नाही असा प्रश्न आता लोक विचारू लागले आहेत.

नाशिकच्या सिडकोमधील ‘ ह्या ‘ लाल बाटल्यांचे रहस्य नक्की काय ?

काही गुण रक्तातच : जाणून घ्या रक्तगटावरून तुमचा स्वभाव

आजपासून करा सुरुवात युट्युबवर पैसे कमवायला : पूर्ण माहिती सोप्या मराठीत

उंदराच्या पॅडने ‘ अशी ‘ वाढवली प्राणिमित्रांची डोकेदुखी

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?