ढिंच्याक पूजाचे ‘ हे ‘ नवीन गाणे सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ

By | September 22, 2017

‘ढिंच्याक पूजा’.. युट्युब च्या माध्यमातून आपल्या भेटीला आली . ‘यु कॅन न इग्नोर हर इजिली’ असं बोलण्याची वेळ नेटिझन्सवर आलीय.

कधी कधी एखादी लहान गोष्ट खूप मोठी प्रसिद्धी देऊन जाते. तसाच काहीसा प्रकार तसंच ढिंच्याक पूजाच्या बाबतीतही झाला होता . गेले काही दिवस ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ काही लीगल प्रॉब्लेम मुळे येणे बंद झालं होतं. काही महिन्यांपूर्वी ढिंच्याक पूजाचे व्हिडिओ युट्यूबवरून काढून टाकण्यात आले होते. पण या अपयशाने खचून न जाता ढिंच्याक पूजा नव्या उमेदीने परत आली आहे. ती आता ‘बापू दे दे थोडा कॅश’ हे नवं गाणं घेऊन आली असून सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

कथप्पा सिंह याच्या विनंतीवरून युट्युब चॅनेलवरून ढिंच्याक पूजाचे १२ व्हिडिओ हटवण्यात आले होते. तत्पूर्वी एका गाण्यामुळे दिल्ली पोलिसांनी तिच्यावर कारवाई केली होती. ‘दिलो का स्कूटर’ या गाण्याचं चित्रिकरण करताना हेल्मेट घातलं नाही आणि वाहतुकीचे नियम मोडले म्हणून तिच्यावर दिल्ली वाहतूक पोलिसांनी कारवाई केली होती (.कित्येक चित्रपटात जे बाईक स्टंट दाखवल जातात ते बहुदा पोलिसांना दिसत नसावेत ).

त्यामुळे जुलैपासून ढिंच्याक पूजा सोशल मीडियापासून चार हात लांबच होती. पण आता ती तिचं ‘बापू दे दे थोडा कॅश’ हे गाणं घेऊन परत आलीय.आता ह्या गाण्यांमधून तिला आणखी किती प्रसिद्धी मिळणार हे मात्र नेटिझन्सच ठरवतील.

मात्र आपल्या पेज तर्फे तिला मनापासून शुभेच्छा देऊयात

@@ पोस्ट आवडली तर नक्की लाईक करा..शेअर करा @@