दानवेंच्या XXX वर गोळी मारण्याची वेळ आली आहे : धनंजय मुंडेचे वादग्रस्त विधान

By | November 28, 2017

dhananjay munde controversy statement about ravsaheb danve

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. नगरमधील उसदरावरून पेटलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यावेळी दोन शेतकरी जखमी झाले होते . त्यात एकाच्या छातीत तर दुसऱ्याच्या हातावर हातावर जखम झाली होती. मात्र आता दानवेंच्या XXX वर गोळी मारण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी दानवे यांचा समाचार घेतला आहे.

नगर जिल्ह्यातील शेवगाव,नेवासा व औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ऊस दराचा प्रश्न चांगलाच पेटलेला आहे. सरकारने ऊस दरात लक्ष घालावे, उसाला चांगला भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली होती. मात्र अत्यल्प वेळातच आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी सुरूवातीला त्यांच्यावर लाठीमार केला. मात्र, तरीही आंदोलक माघार घेत नसल्याने पोलिसांनी या ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या व हवेत गोळीबार केला होता. पोलिसांनी गोळीबाराचे वृत्त नाकारले होते मात्र दोन शेतकरी यात जखमी देखील झाले होते.

जखमी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या छातीवर गोळीबार न करता पायावर गोळीबार करायला हवा होता असं वक्तव्य केलं होतं. पुढे जखमी शेतकऱ्यांना भेटण्याची रीघ लागली , राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तसेच धनंजय मुंडे यांनी देखील ह्या शेतकऱ्यांची विचारपूस केली होती.

रावसाहेब दानवे हे आधीपासून आपल्या वादग्रस्त बोलण्या बद्दल चर्चेत राहिले आहेत. शेतकऱ्यांना ‘साले ‘ असे म्हणून त्यांनी नाहक वाद वाढून घेतला होता. मात्र आता दानवेंच्याच XXXवर गोळी मारण्याची वेळ आली असल्याचं सांगून दानवेंच्या कारभारावर मुंडेंनी ताशेरे ओढले आहेत . राष्ट्रवादी काँग्रेस कडून जालना इथे आयोजित करण्यात आलेल्या हल्लाबोल सभेत ते बोलत होते . यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.

उद्धव मापारे आणि बाबुराव दुकळे हे दोन शेतकरी नगर गोळीबारात गंभीर जखमी झाले होते व त्यांच्यावर शेवगाव येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते . ऊसाला ३ हजार १०० रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती . व ह्या आंदोलनाने पुढे मोठे स्वरूप घेतले व पोलिसांना गोळीबार करावा लागला होता . त्यावेळी रावसाहेब दानवे यांनी पायावर गोळीबाराबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळले : मावळची पुनरावृत्ती करत पोलिसांचा गोळीबार

जिभेला हाड नसणाऱ्या अशाच काही भाजपपासून ते काँग्रेसपर्यंतच्या नेत्यांची ‘ वादग्रस्त ‘ विधाने

? सहमत असाल तर लाईक करा शेअर करा ?