‘ अशी ‘ करत होता अॅमेझॉनची फसवणूक : तब्बल ५० लाखाला लावला चुना

By | October 12, 2017

दिल्लीतील एका बेरोजगार तरुणाने अॅमेझॉनला लाखोंचा गंडा घालता आहे. दोन-तीन महिन्याच्या कालावधीत त्याने अॅमेझॉनवरून जवळपास १६६ महागडे फोन मागवले. हे फोन त्याच्या पत्त्यावर पोहोचल्यानंतर मोबाईलऐवजी रिकामी खोके आले असं सांगून प्रत्येक वेळेचीअॅमेझॉनला फसवत होता . मोबाईलऐवजी रिकामी खोक्यांची डिलिव्हरी होण्याचे प्रकार अती झाल्यावर अॅमेझॉनच्या हे लक्षात आलं.अॅमेझॉनने दिल्ली पोलिसांत याची तक्रार केली, त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

दिल्लीत राहणारा २१ वर्षीय तरूण शिवम चोप्रा हा बेरोजगार होता . दिल्लीतल्या विद्यापीठातून त्याने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं. पण, शिक्षित असूनही नोकरी न मिळाल्याने त्याने चुकीच्या मार्गानं पैसे कमावण्याचा निर्णय घेतला .

शिवम अॅमेझॉनवरून महागडे मोबाईल मागवायचा. त्यांने आतापर्यंत १६६ फोन अॅमेझॉनवरून मागवले. दरवेळी तो वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरून आपली ऑर्डर द्यायचा. पत्ताही चुकीचा द्यायचा. मोबाईलची डिलिव्हरी घेऊन डिलिव्हरी बॉय पोहोचायचा तेव्हा पत्ता शोधण्यासाठी त्याला अडचणी यायच्या. डिलिव्हरी बॉय पत्ता विचारण्यासाठी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करायचा, फोन आला की दिलेल्या पत्त्याच्या आसपास असणाऱ्या ठिकाणी डिलिव्हरी बॉयला बोलावून शिवम आपली ऑर्डर स्वीकारायचा.यामुळे कोणालाही शंका येत नसे . ऑर्डर मिळाल्यानंतर आपल्याला फोनऐवजी रिकामा खोकं आलं असं खोटं सांगून तो अॅमेझॉन ला रिफंड मागायचा.त्यामुळे ग्राहकाच्या तक्रारीवर विश्वास ठेवून त्याला रिफंडही मिळायचे. रिफंड मिळाल्यानंतर शिवम आलेला मोबाईल फोन बाहेर विकून टाकत असे.

असं करून त्याने लाखो रुपये कमावले. रिफंड मागण्याचे प्रकार वारंवार होत असल्याचे लक्षात येताच अॅमेझॉनने याची दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करत शिवम आणि आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. पोलिसांनी शिवमच्या घरातून १९ महागडे फोन, १२ लाखांची रोख रक्कम आणि ४० विविध बँकाचे पासबुक जप्त केले आहेत. आतापर्यंत शिवमने असे ५० लाख रुपये कमवल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे .

? पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply