पुण्यात 17 वर्षीय तरुणीचा विवस्त्र मृतदेह आढळला : चार दिवसांपासून होती बेपत्ता

By | December 5, 2017

dead body of 17 year old girl found in chakan pune

पुणे जिल्ह्यातील चाकणमधील धामणे येथील एका शेतात 17 वर्षीय तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. अल्पवयीन १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्दयीपणे खून करण्यात आल्याची चर्चा आहे . तसेच तरुणीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चाकण पोलिसांनी व्यक्त केला आहे.

धामणे येथील शेतात 1 डिसेंबरला आईसोबत पीडित मुलगी काम करत होती. सायंकाळी 4 च्या सुमारास ती पाणी आणायला गेली, परंतु ती परत आलीच नाही. तिच्या कुटुंबियांनी शोध सुरु केला होता तसेच चाकण पोलिसांत तक्रार देखील नोंदवण्यात आली होती मात्र सोमवारी (१ डिसेंबर) शेताच्या जवळच तिचा मृतदेह आढळून आला. तिच्यावर अत्याचार करून नंतर मारून टाकल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला आहे.

बेलझुरी परिसरातील शेतात विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेहापासून दोनशे फुटाजवळ रक्ताने माखलेला दगड व रक्ताचे मोठ्या प्रमाणावर डाग आढळले आहेत. फेकून दिलेला मोबाईलही सापडला. मुलगी विवस्त्र अवस्थेत असल्याने पोलिसांनी मुलीवर अतिप्रसंग करून खून केला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

पीडित मुलगी १ डिसेंबर रोजी आईबरोबर शेतात काम करण्यासाठी गेली होती. दुपारी ३ .३० च्या सुमारास पिण्यासाठी पाणी घेऊन येते म्हणून ती शेतातून गेली. सायंकाळी ६ .३० वा आई घरी आल्यावर देखील ती आलेली नव्हती म्हणून भावाने फोन केला असता फोन बंद आला. कुटुंबियांनी रात्री १ वाजेपर्यंत शोध घेतला परंतु ती कोठेच आढळून आली नाही. या नंतर ती गायब असल्याची तक्रार चाकण पोलीस चौकीत करण्यात आली.

चार दिवसांनी सोमवारी (४ डिसेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भाऊ प्रशांत हा बरेच दिवस शेतीला पाणी दिले नाही, म्हणून पाणी देण्यासाठी शेतात गेला. पाण्याच्या कॉकजवळ एक मृतदेह त्याला दिसला. पायात असलेला काळा धागा व तेथे असलेले त्या दिवशी घातलेले लाल रंगाच्या ब्लेझर त्याला दिसल्यावर ती बहिणच असल्याची खात्री झाली आणि त्यांनी टाहो फोडला.मग सगळे कुटुंबीय जमले आणि त्यांनी पोलिसांना खबर दिली.

या वेळी मृतदेह ओळखण्याच्या स्थीतीत नव्हता. चेहरा अत्यंत विद्रुप कलेला अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक मनोजकुमार यादव यांनी घटनास्थळास भेट देऊन तपासाबाबत तातडीने सुचना केल्या. घटनास्थळी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते. सगळ्या शक्यतांवर पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान या ठिकाणी असलेल्या एका कंपनीत परप्रांतिय कामगारांवर संशय व्यक्त करीत मोठा जमाव कंपनीबाहेर जमला होता. मात्र पोलिसांनी लोकांना कायदा हातात घेऊ दिला नाही .

प्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

विवाहबाह्य संबंधास अडथळा ठरणाऱ्या बायकोचा पाचव्या मजल्यावरून ढकलून खून

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?