‘ ह्या ‘ मुस्लिम देशाला गाय देणार आधार

By | September 28, 2017

ऐकायला विचित्र वाटेल पण हा मुस्लिम देश देखीलआता मुस्लिम राष्ट्रांनी बंदी घटल्यानंतर शेवटी गायीच्या आश्रयाला आलाय .. हो ही बातमी खरी आहे .. ह्या लहानश्या खाडी देशात २७ लाख लोक उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीमधून आपले पोट भरू शकणार नाही

आपण बोलतोय कतर बद्दल , सध्या कतर अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर युरोपीय देश व शेजारील देशातून आयात करतो .. आणि त्याचा फायदा घेऊन काही मुस्लिम देश त्याला कचाट्यात पकडू पाहत आहेत . सौदी अरब सोबत असलेला संपर्क पूर्ण तुटलेला आहे तर संयुक्त अरब अमीरात आणि बहरीन यांच्या सोबतही कोणताच संपर्क नाही .

म्हणून भविष्याचा विचार करून कतरने अन्नधान्य व दुग्ध उत्पादनासाठी स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे . त्याचाच एक भाग म्हणून कतरने सुरुवातीला अमेरिकेतून आणि युरोप मधून ६५० होल्स्टिन गायांची आयात केली आहे . त्यांच्यासाठी स्वतंत्र वातानुकूलित कक्ष तयार केले आहेत . ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत आणखी ३००० गाया आणल्या जातील. कतरच्या खराब परिस्थितीमध्ये गायीने आधार दिला म्हणून भविष्यात कतर ने गोहत्याबंदी कायदा केल्यास नवल वाटायला नको .

डेअरी फार्मिंग ची सुरवात करून कतर एक नवा अध्याय लिहतोय असा समजायला हरकत नाही . जर सगळे विनाअडथळा झाल तर कतर ह्या गोष्टींसाठी फक्त अवलंबून राहणार नाही तर डेअरी उत्पादने निर्यात सुद्धा करू शकेल, याखेरीच कृषी क्षेत्रात देखील आता कतर ने स्वावलंबी व्हायचं ठरवलंय. २०२२ ला विश्व कप साठी लोक येतील तेव्हा स्थानिक फळ आणि डेअरी प्रॉडक्ट्स विकत घेऊ शकतील अस स्थानिकांच म्हणणं आहे .

@@पोस्ट आवडली तर लाईक करा ..शेअर करा @@