गायींची तब्बल ५० वासरे कत्तलखान्यापासून वाचवली : असे धरले गोवंश तस्कर

By | December 1, 2017

police fires on farmers in ahmednagar district protesting for sugarcane rate

गोवंशची हत्या व तस्करीवर बंदी असली तरी त्यामुळे काही जणांचे रोजगार तर काहींचे जिभेचे चोचले बंद झाले आहेत . परिणामी कायद्याच्या पळवाटा तसेच पोलीस यंत्रणेच्या निष्क्रियतेचा फायदा घेत पडद्याआडून हे उद्योग सुरु आहेत . अर्थात पोलीस देखील आता सतर्क झाले असून याआधी नगर जिल्ह्यातील संगमनेर इथे देखील मोठ्या प्रमाणावर गोमांस जप्त केले होते. ह्यावेळी मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील पोलिसांनी गोवंश तस्करी करणारे चार जण धरले असून त्यांची सखोल चौकशी चालू आहे.

गोवंश तस्करी करणाऱ्या चार जणांना पैठण तालुक्यातील बिडकिन व औद्योगिक वसाहत पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून दहा चाकी ट्रक, दोन चारचाकी वाहनासह एकूण २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. सल्लाद्दीन शेख असे पळून गेल्याचे नाव असल्याचे समजते.

बिडकिन पोलीस उपनिरीक्षक पंडीत सोनवणे हे नेहमीप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करत असताना बुधवारी पहाटे चारच्या सुमारास पैठण औरंगाबाद रस्त्यावरील ढोरकीन गावालगत असणाऱ्या चामड्याच्या कारखान्याजवळ काही तरुण ट्रकमधून गायीचे वासरु खाली उतरवत असताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी गाडी थांबवून हटकताच पाच तरुणांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून चार तरुणांना ताब्यात घेतले, मात्र एक अरोपी फरार झाला. ह्या ट्रकमध्ये गायींची तब्बल ५० वासरे सापडली. त्यांना आता पारुडी येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे. औरंगाबाद येथील कत्तल खान्यात विक्री करण्यासाठी ही वासरे मध्य प्रदेशावरून आणल्याची कबुली ह्या आरोपींनी दिली आहे.

अबीद शकुरखा डोल (मुलतानपुर-मध्यप्रदेश) आझाद मंहमद रफिक (न्याहगर, मध्यप्रदेश), शेख खलील शेख रशीद (औरंगाबाद), फेरोज सलमान शेख, (औरंगाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, सल्लाद्दीन शेख हा फरार झाला आहे.घटना पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाणे हद्दीतील असल्याने बिडकिन पोलिसांनी गोवंश व सर्व मुद्देमाल औद्योगिक वसाहत पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. याप्रकरणी याप्रकरणी पाच जणाविरुध पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बऱ्याच दिवसांपासून गोरख धंदा सुरू असावा, असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे.आता लवकरच ह्या तस्करांच्या मागचे कर्ते करविते देखील पोलिसांच्या हाती येतील अशी आशा करूयात.

जगातला सर्वात मोठा २००० कोटी रुपयाचा १६ जणांचा दरोडा: वैयक्तिक भांडवल ९ कोटी

सायबर गुन्हेगारीबद्दल समोरच्याला माहित असूनही ‘अशी ‘ केली फसवणूक

धक्कादायक.. एक कोटीच्या खंडणीसाठी जिवंत जाळले : महाराष्ट्रातील घटना

कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून विवाहितेवर सामूहिक बलात्कार : महाराष्ट्रातील दुर्दैवी घटना

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?