अखेर मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमा प्रकरणावर नाव न घेता केला ‘ ह्यांचे ‘ कडे इशारा

By | January 3, 2018

cm blames jingesh mewani for koregaon bhima crisis

भीमा कोरेगावच्या दुर्दैवी घटनेबद्दल कितीही लिहले तरी कमीच आहे . प्रगत समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात जातीपातीची मुळे किती खोलवर रुजली आहेत. हे देखील या निमित्ताने लक्षात आले. पेजवरून जिग्नेश मेवानी व उमर खालेदवर कारवाई का करू नये अशा स्वरूपाची एक पोस्ट टाकली होती. त्याला खूप जणांनी पाठिंबा दिला. कारण पुणेमध्ये बोलताना जिग्नेश मेवानी व उमर खालेद यांनी निओ पेशवाई ह्या शब्दांचा वापर करत, तसेच मोहन भागवत व मोंदींवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. जातीचे नाव घेऊन ह्या दोघांकडून बरेच सुनावण्यात आले. अर्थात काही चांगले ऐकायच्या निमित्ताने आलेल्या लोकांना याचा काय फायदा झाला नाही मात्र ह्या भाषणाने फक्त डोकी भडकवायचे काम केले.

आम्ही पोस्ट केलेल्या पोस्टशी समांतर अशीच काहीशी ह्या घटनेबद्दल मुख्यमंत्रांची देखील प्रतिक्रिया होती. मुख्यमंत्रानी जिग्नेशचे नाव घेतले नाही मात्र टीकेचा रोख हा जिग्नेश व उमर यांच्याकडेच होता .मुख्यमंत्री म्हणाले, भीमा कोरेगावला जी काही घटना घडली त्याची चौकशीचे आदेश दिले आहेत, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. पण महाराष्ट्रात सध्या बाहेरचे लोक येतात आणि जातीवादाचे मुद्दे काढतात. ज्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत तेच असं तणावपूर्ण वातावरण निर्माण करतात. पण आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता याला बळी पडणार नाही. विचारांच्या संकुचितपणामुळे काही लोक परस्परविरोधी उभे ठाकलेत. ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत त्यांनीच हा अकारण वाद निर्माण केलाय. आज लोकांना तणावमुक्ती आणि विकास हवाय. विकास हा शांततेतच शक्य आहे. जी घटना झाली ती दुर्दैवीच आहे. पण म्हणून काही त्या घटनेचा राजकीय लाभ उकळण्याचा प्रयत्न कुणी करू नये आणि तशी संधी माध्यमांनीही कुणाला देऊ नये.

काळ संध्याकाळी भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आल्याची घोषणा भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. काल प्रकाश आंबेडकर यांनी हा बंद शांततेत पार पडला जावा असे आवाहन केले होते मात्र दिवसभर झालेल्या राड्यासाठी त्यांनी हिंदुत्ववादी संघटनांना जबाबदार धरले. त्याचबरोबर संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोघांविरुद्ध याकूब मेमनप्रमाणे भारतीय दंडविधानाच्या कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी त्यांनी केली.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले , सर्वोच्च न्यायालयाने याकूब मेमनला फाशीची शिक्षा देताना असे म्हटले होते की याकूब मेमन बॉम्बस्फोट झाले तिथे हजर नव्हता. मात्र या कटात तो सहभागी होता. त्याला बॉम्बस्फोट होणार हे माहिती होते. त्यामुळे त्याला फाशी देण्यात येत आहे. तोच न्याय इथे भिडे व एकबोटे यांना लावावा . भीमा कोरेगाव घटनेतील मुख्य सूत्रधार शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आहेत, त्यांना अटक करण्यात यावी.काही जण विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद आणि जिग्नेश मेवानी यांची नावे घेतली जात आहेत, पण त्यांचा याच्याशी संबंध नाही. जोपर्यंत माझ्या हातात होते तोपर्यंत मी आंदोलन शांत ठेवण्याचे काम केले.

प्रकाश आंबेडकर काहीही म्हणोत, सर्व घटनाक्रम पाहता ह्या सर्व गोष्टी पूर्वनियोजीत असल्याची चर्चा आहे, आणि एकाच दिवसात इतके सगळे घडवून आणणे यासाठी मोठी यंत्रणा हाताशी धरली असावी अशी देखील लोकांमध्ये चर्चा आहे. कदाचित पोलिसांच्याही पुढे असलेल्या ह्या लोकांपर्यंत पोलिसदेखील पोहचू शकणार नाहीत मात्र महाराष्ट्राचे झालेले नुकसान व बदनामी परत कधी भरून येणार नाही.

भिडे आणि एकबोटे यांच्याविरुद्ध याकूब मेमनप्रमाणे 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करावा

आपल्यावरील आरोपांबद्दल मिलिंद एकबोटे काय म्हणतात ? : कोरेगाव भीमा प्रकरण

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल : सविस्तर बातमी

२०० वर्षांपूर्वी कोरेगाव भीमाला झाले काय होते ? : वाद का तयार झाला

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा