बापरे .. भर स्टेडियम मध्ये दिली तब्बल १० जणांना फाशीवर लटकवले

By | December 20, 2017

china hangs 10 people in stadium for drug case

चीनमध्ये हजारो प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये 10 जणांना फासावर लटकवल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. दक्षिण चीनमधील गुआंगडोंग प्रांतात ही घटना घडली.

चीनमधील सरकारची मनमानी सत्ता ही आपल्याला चांगलीच परिचयाची आहे . कट्टर इस्लामी देशातले कडक कानून याविषयी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चर्चा होते मात्र चीनमधील विवादास्पद अशा गोष्टींबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत नाही. कुत्र्याची हत्या करून त्यांचे फेस्टिवल साजरे केले जाणे असो व मंकी डिश .. मानवांचे भ्रूण देखील चीनमध्ये विकले जात असल्याची चर्चा आहे . आता चीन अशाच एका विचित्र गोष्टीमूळे चर्चेत आला आहे. ही गोष्ट आहे चीनच्या गुआंगडोग प्रांतातली.

गुआंगडोग प्रांतातील सात व्यक्तींवर ड्रग्स तस्करी, तर तीन जणांवर हत्या आणि दरोड्याचे गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.चीनच्या न्यायालयात या दहाही जणांवर खटला चालवण्यात आला. ह्या आरोपांमध्ये हे सर्वजण दोषी आढळले त्यामुळे ह्या सर्वाना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.अर्थात ही फाशी जाहीर देणार असल्याचे देखील सांगण्यात आले होते. त्यामुळे हा मोठा चर्चेचा विषय झाला होता.

अर्थात ही फाशीची शिक्षा बहुतांश देशात जेलमध्ये देण्यात येते, मात्र चीनच्या प्रशासनाने ही फाशी स्टेडियममध्ये देण्याचे ठरवले होते.एक मोठा संदेश याद्वारे लोकांना द्यायचा होता म्हणून मोठ्या प्रमाणावर याची जाहिरातबाजी देखील करण्यात आली. प्रशासनाने हजारो नागरिकांना सोशल मीडियाद्वारे आमंत्रित केलं होतं. या आमंत्रणानंतर हजारो नागरिक स्टेडियमवर जमा झाल्यानंतर, त्यांच्यासमोर या दहाही जणांना फाशी देण्यात आली.

उपस्थित व्यक्तींपैकी काही जणांनी ही घटना आपल्या मोबाइल मध्ये शूट केली आणि याचा एक व्हिडिओ वायरल देखील झाला आहे. बाकी देशांच्या तुलनेत चीन मध्ये फाशी देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अर्थात चीनच्या बऱ्याच गोष्टी बाहेर यात नसल्याने अधिकृत अशी आकडेवारी उपलब्ध नाही मात्र अशी कृत्ये करणाऱ्या लोकांना धडा मिळावा म्हणून चीन ह्या गोष्टीची देखील जाहिरात करते, असा जाणकारांचा अंदाज आहे.एनजीओच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी चीनमध्ये तब्बल दोन हजार जणांना मृत्यू दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

कुराण आणि नमाजची चटई सरकारजमा करा: भारताच्या शेजारच्या देशातील बातमी

पाकिस्तानच्या घरावर हिंदुस्थान जिंदाबाद आणि सारे जहाँसे अच्छा : काय आहे प्रकरण ?

ही ४१ अॅप चोरतात फोटो व्हिडिओ कॉन्टॅक्टस आणि लोकेशन्स : गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

डेटा चोरीच्या आरोपाखाली यूसी ब्राऊजर ला दाखवला गुगलने बाहेरचा रस्ता

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?