कुराण आणि नमाजची चटई सरकारजमा करा: भारताच्या शेजारच्या देशातील बातमी

By | October 1, 2017

bann on namaj quran china

भारत हा सर्व धर्माना आपले मानतो तसेच सर्व धर्मांचा सन्मान करतो .विविधतेतुन एकता हा भारताचा संदेश आहे. तरीदेखील काही समाजविघातक प्रवृत्ती मधून मधून आपले डोके वर काढत असतात. आमच्यावर अन्याय होतो असे नेहमीचे रडगाणे रडत राहतात . बाहेरच्या देशात अल्पसंख्यांकांशी किती भेदभाव केला जावा, याला काही सीमा नाही .

चीनच्या शिनज़ियांग प्रांतात चिनी अधिकांऱ्यानी मुस्लिम समुदायास नमाजसाठी वापरली जाणारी चटई तसेच कुराण व बाकी सर्व धार्मिक साहित्य जप्त करण्याचा वटहुकूम काढला आहे . हे बहुतांश मुस्लिम विगर, कज्जाक आणि किरजीक वंशाचे आहेत . मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शिनज़ियांग मध्ये शांती असून लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगितले आहे .

मात्र ‘रेडिओ फ्री आशिया’ च्या नुसार स्थानिक लोकाना व मस्जिद मध्ये स्पष्ट हुकूम देण्यात आला असून अंमलबजावणी न केल्यास कडक शिक्षेस सामोरे जाण्याची तयारी ठेवण्यास सांगितले आहे . याआधी देखील, शिनज़ियांग मध्ये मुस्लिम समुदायास लांब दाढी ठेवणे किंवा रोजा मध्ये उपवास ठेवण्यास बंदी घातली गेलेली आहे. मात्र ह्या वेळी स्थानिक लोकांच्या हवाल्याने ‘रेडिओ फ्री आशिया’ ने कुराण जप्त केल्याच्या मागणीस दुजोरा दिला आहे. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो कि, ह्या वर्षीच्या सुरुवातीला देखील शिनजियांग मधील मागील पाच वर्षाच्या दरम्यान प्रकाशित झालेल्या कुराण च्या आवृत्ती ‘अतिरेकी सामग्री ‘ म्हणत जप्त करण्यात आल्या होत्या .

उपलब्ध माहितीनुसार ‘थ्री इलीगल एंड वन आइटम’ या अभियाना अंतर्गत पवित्र कुराण व बाकी सर्व धार्मिक गोष्टींवर, तसेच अतिरेकी हल्ल्यासाठी वापर होऊ शकणाऱ्या गोष्टी जसे कि रिमोटच्या खेळण्या, चाकू या वर बंदी घालण्यात आली आहे . शिनजियांग मधील हे लोक मूळचे तुर्क वंशाचे असल्याचे सांगितले जाते. यांची संख्या १ कोटीच्या दरम्यान आहे .

@@पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा @@