भाजप खासदार गांधी व छिंदमकडून शिवप्रेमींची दिशाभूल केल्याचा आरोप :श्रीपाद छिंदमची कबुली

By | June 9, 2018

sripad chhindam got beaten in ahmednagar jail

अहमदनगर मनपातील भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने आपण उपमहापौरपदाचा राजीनामाच दिला नसल्याचा दावा करत शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम यांनी माझ्या लेटरहेडचा गैरवापर करून माझी बनावट सही असलेला राजीनामा राजकीय षडयंत्रातून मंजूर केल्याचा आरोप केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अश्लाघ्य वक्तव्य केल्याने २६ फेब्रुवारी २०१८ रोजी झालेल्या महासभेत छिंदमचा उपमहापौरपदाचा राजीनामा मंजूर करून त्याचे नगरसेवकपद रद्द करण्याचाही ठराव झाला आहे. या ठरावानुसार मनपा प्रशासनाद्वारे नगरविकास खात्याला छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याबाबत प्रशासकीय कारवाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर छिंदमचे म्हणणे जाणून घेण्यासाठी नगरविकास विभागाने त्याला नोटीस पाठवली आहे. त्या नोटिशीला उत्तर देताना त्याने आपण राजीनामाच दिला नसल्याचे म्हणणे मांडले आहे.त्यावरून आता नवीन वाद तयार होण्याची चिन्हे आहेत . आम्ही पेजवरून आधीच श्रीपाद छिंदम याला भाजपमधून देखील काढलेले नाही हे कित्येक वेळा सांगितले आहे, याची देखील आता ह्या श्रीपाद छिंदमच्या कबुलीने पुष्टी झालेली आहे आणि भाजपचे शिवद्रोही रूप देखील समोर आले आहे.

श्रीपाद छिंदमच्या ह्या आरोपावर सेनेच्या माजी शहर प्रमुख व महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम यांनी , छिंदमचे प्रकरण अंगलट आल्यावर त्याचे राजकीय गुरू दिलीप गांधी यांनीच त्याचा राजीनामा महापौर कार्यालयास पाठवला आहे व आता छिंदमला उपमहापौरपदाचा राजीनामा दिला नसल्याचा तीन महिन्यांनी साक्षात्कार झाल्याने व त्यावर खासदार गांधी यांनी मौन बाळगल्याने भाजपने व खासदार गांधी यांनी शिवप्रेमींची दिशाभूल केल्याचे स्पष्ट होत आहे. छिंदमची हकालपट्टी करून व त्याचा उपमहापौरपदाचा राजीनामा घेतल्याचे खासदार गांधी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते व आता छिंदमच्या भूमिकेबद्दल ते मौन बाळगून आहेत, त्यामुळे उपमहापौरपदाच्या राजीनाम्यावरून खासदार गांधी व छिंदम हे संगनमताने जनतेची व शिवप्रेमींची दिशाभूल करीत आहेत’, असा दावाही संभाजी कदम यांनी या प्रत्युत्तरात केलेला आहे.

  • शिवद्रोही श्रीपाद छिंदमचे काय आहे म्हणणे ?

‘माझ्याशी संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असताना नगरसेवकपद रद्द करणे बेकायदेशीर आहे, माझ्या कोणत्याही संमती वा स्वाक्षरीशिवाय माझ्याविरुद्ध बनावट कागदपत्रांआधारे षडयंत्र रचले गेले आहे, माझी स्वतःची सही असलेला कोणताही उपमहापौरपदाचा राजीनामा मी महापौरांकडे दिलेला नाही, उलट ज्या तारखेचा हा राजीनामा दाखवला जात आहे, त्या तारखेस मी पोलिस व न्यायालयीन कोठडीत असल्याने असा कोणताही राजीनामा मी सही करून देणे शक्य नव्हते, महापौरांनी माझ्या लेडरहेडचा गैरवापर करून माझी बनावट सही असलेला राजीनामा वापरून तसेच माझ्यावर केस चालू असल्याचा गैरफायदा घेऊन व राजकीय षडयंत्र करून उपमहापौरपदाचा राजीनामा तयार करून तो मंजूर करण्याचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला आहे’, असा दावा छिंदमने नगरविकास विभागाला पाठवलेल्या उत्तरात केला आहे.

श्रीपाद छिंदमच्या राजीनाम्याचे वृत्त खोटे , पेशवाईचा छिंदमला पाठिंबा : नगरकर रस्त्यावर

नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आता बाहेर : न्यायालयात काय म्हणाला ?

हेच बघायचं बाकी होत : भाजपाचा माजी उपमहापौर छिंदम याचे तृतीयपंथी होर्डिंग ‘ ह्या ‘ ठिकाणी

भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमची जेलमधील दशा दुर्दशा : आता ठेवायचे तरी कुठे ?

शिवभक्तांचा संताप श्रीपाद छिंदमला भोवला : आणखी ‘ इतके ‘ दिवस जेलमध्ये खितपत पडणार

नगरचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्याबद्दल ‘ मोठी ‘ बातमी

भाजपाचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याला जेलमध्ये कैद्यांनीच चोपला :नगरची घटना

व्हॅलेंटाइन डे ला भाजप नगरसेविकेने आपल्या पतीला भर रस्त्यावर ‘ ह्या ‘ कारणावरून दिला चोप :महाराष्ट्रातील घटना

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा