Category Archives: पुणे

रातोरात रस्त्यावर आणणारा गुगलचा नॉन्सेन्स प्रोग्रॅम : डाटाचोर गुगलच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश

केंब्रिज ऍनालिटिका आणि फेसबुक यांचा डेटा चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर आपण खरोखर इंटरनेटवर सुरक्षित आहोत का ? हा प्रश्न प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहणार नाही. अर्थात याचे दुर्दैवी उत्तर ‘ नाही’ असेच आहे. आता मुख्य म्हणजे आपला डेटा चोरतो तरी कोण आणि कशासाठी ? आपला डेटा तोच व्यक्ती किंवा कंपनी चोरते ज्यांना त्याचा काही फायदा आहे, म्हणजे… Read More »

प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी स्वतःच्या पत्नी व बाळाची केली हत्या : महाराष्ट्रातील संतापजनक घटना

प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी आपल्या पत्नी आणि दहा महिन्यांच्या बाळाची हत्या करवून आणल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार हिंजवडी (पुणे ) जवळील नेरे भागात भागात घडला आहे. यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव अश्विनी भोंडवे तर बाळाचे नाव अनुज असे आहे. दत्ता भोंडवे असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणात दत्तासह त्याची प्रेयसी व दोन मारेकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.… Read More »

गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या खूनाचे पुणे कनेक्शन : टाइम्स ऑफ इंडियाचे वृत्त

गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या हिंदू जनजागृती समितीशी संबंधित अमोल काळे ह्या व्यक्तीचा प्राध्यापक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे. कलबुर्गी यांच्या घरात गेलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एक जण अमोल काळे होता. कलबुर्गी कुटुंबातील एका व्यक्तीने अमोल काळेची ओळख पटवल्याची माहिती समोर येते आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी… Read More »

दोन मुलांची आई वीस वर्षीय बेरोजगार प्रियकराबरोबर झाली फरार : पोलिसांना केली ‘ ही ‘ मागणी

दोन मुलांची आई असलेल्या ३२ वर्षीय महिलेने शेजारच्या २० वर्षीय बेरोजगार प्रियकराबरोबर पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच जळगाव ,अमळनेर येथे उघडकीस आला आहे . हे युगुल पळून पुण्याला गेले होते मात्र त्यांच्या पाठोपाठ पोलीस देखील तिथे पोहचले आणि पोलिसांनी या महिलेला पुण्यातून ताब्यात घेऊन जळगावात आणले. मात्र त्यानंतर तिने जे सांगितले एक ऐकून पोलीस देखील… Read More »

… तर तुझा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करेल : जमावाने चोप देत नेले पोलीस स्टेशनला

शिक्षक आणि विद्यार्थी हे पवित्र नाते असते मात्र काही व्यक्ती वासनेच्या एवढे आधीन होतात कि ह्या पवित्र नात्याला देखील काळिंबा फासतात . असाच प्रकार पुण्याजवळ शिरूर इथे घडला आहे . शिरूर परिसरात शिक्षकाने विद्यार्थिनीवर दोन वेळा अत्याचार करत त्याचे चित्रीकरण केले आणि पुढे हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. धमकी देऊन पुन्हा अत्याचार केले आणि… Read More »

मोदींएवढा घाबरून गेलेला पंतप्रधान आम्ही पाहिला नाही : महाराष्ट्राच्या ‘ ह्या ‘ माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचे वक्तव्य

कर्नाटकामध्ये राज्यपालांनी भारतीय घटनेप्रमाणे कार्यवाही केली. सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपाला सरकार स्थापनेसाठी पाचारण केले यात काही चूक वाटत नाही. मात्र, भाजपा बहुमत सिद्ध करू शकणार नाही. तिथे कॉँग्रेस व जेडीयूचेच सरकार स्थापन होईल. राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी पाचारण केले यात काही चूक वाटत नाही. मात्र, हेड काऊंटप्रमाणे काँग्रेस व जेडीयूला प्रथम संधी द्यायला हवी होती,… Read More »

महाराष्ट्रातील ‘ ह्या ‘ सुसंस्कृत शहरात हॉटेल व्यावसायिकाची बेदम मारहाण करून हत्या

पुण्याच्या मावळमध्ये हॉटेल व्यवसायिकाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली.त्यानंतर मृतदेह हा त्यांच्याच घराशेजारी असलेल्या रस्त्यावर फेकून दिला. ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडली असून पहाटे योगेश यांच्या भावाला माहिती मिळाली त्यानंतर मयत योगेशला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तोपर्यंत योगेश यांचा मृत्यू झाला होता. अद्याप या हत्येमागील कारण अस्पष्ट आहे. अधिक तपास वडगाव पोलीस… Read More »

समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तरुणावर केले चाकूने वार :पुण्यातील घटना

पिंपरी-चिंचवडमध्ये समलैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका 40 वर्षीय पुरुषाने 29 वर्षीय तरुणावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तरुण गंभीररित्या जखमी झाला असून पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. हरीश रमेश कुकरेजा असे ह्या आरोपीचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी… Read More »

मी मनोहर कुलकर्णी नव्हे, तर संभाजी भिडेच : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण

पुणे : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलप्रकरणी म्हणणे दाखल करताना माझे नाव मनोहर विनायक कुलकर्णी नसून माझे नाव संभाजी भिडेच असल्याचे म्हणणे त्यांच्या वकिलांनी आज न्यायालयात सादर केले. दरम्यान, त्यांच्या वकिलांना याप्रकरणी सविस्तर म्हणणे मांडण्यासाठी सर्व कागदपत्रे पुरविण्याचे आदेश विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी दिले आहेत. कोरेगाव भीमा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रथमच संभाजी भिडे यांच्या… Read More »

मनोहर भिडे मोकाट मात्र महाराष्ट्रभर दलित नेत्यांच्या कार्यालय व घरांवर छापे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण

पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर रोजी झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याच्या गुन्ह्यात आज पुणे पोलिसांनी कबीर कला मंचचे कार्यकर्ते आणि दलित नेत्यांच्या कार्यालयांवर छापे टाकून शोध मोहिम सुरु केली आहे. पुण्याबरोबरच मुंबई, दिल्ली, नागपूर आणि गडचिरोली परिसरात हे छापे टाकण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुण्यात ३१ डिसेंबर २०१७… Read More »