Category Archives: नाशिक

धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली.. मुख्यमंत्री परदेशी गुंतवणूक काय चाटायची आहे?

धर्मा पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर शिवसेनेदेखील सरकारवर हल्लाबोल केला आहे . धर्मा पाटील यांची हत्या भाषण माफियांनी केली असून जे घडले ते विदारक आहे असे देखील सुनावले आहे . महाराज असते तर सरदार आणि वतनदारांचा कडेलोट केला असता. मुख्यमंत्रानी राज्य चालवावे भाजप नाही असा सल्ला देखील आजच्या सामनामधून सरकारला देण्यात आला आहे . एजंट कडून… Read More »

‘ ही ‘ एक गोष्ट राष्ट्रवादी विसरून गेली : बावनकुळे व रावल यांच्यावर ३०२ लावण्याची मागणी

धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकारला जाग आली असून लेखी स्वरूपात कुटुंबियांना आश्वासन देण्यात आले आहे. घटना घडून गेल्यावर आपल्याला जाग येते हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे . एल्फिस्टनचा अपघात असो किंवा सावित्री पूल दुर्घटना, काही बळी गेल्याशिवाय सरकारला जाग येतच नाही असा कारभार आहे . राज्यसरकारच्या लेखी आश्वासनानंतर अखेर या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेतले… Read More »

सरकारी कार्यालयाबाहेरील असंख्य धर्मा पाटील कोणी जन्माला घातले ? : लेख नक्की वाचा

धर्मा पाटील यांचा मृत्यू अस्वस्थ करून गेला.. काय लिहावे हे न कळण्याइतपत मेंदू सुन्न झालाय ..भरलेल्या डोळ्यांनी लिहतोय, काही चुकलं तर माफ करा मित्रानो.. कारण चीड येऊ लागली ह्या सगळ्या प्रकारची .. वीज प्रकल्पासाठी त्यांची ५ एकर जमीन गेली ती देखील फक्त 4 लाख 3 हजार रुपयामध्ये .. शेजारच्या शेतकऱ्याची जमीन पावणे २ एकर मोबदला… Read More »

धर्मा पाटील यांच्यावरील शासकीय अन्याय आणि माजोरडेपणाची कथा : आहे का भारत प्रजासत्ताक ?

शासकीय दरबारी गरिबांवर झालेल्या अन्यायाच्या कथा आपल्याला काही नवीन नाहीत . मात्र धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी ह्या अन्यायाला कंटाळून अक्षरश: विष घेतले तरी अजून सरकारी यंत्रणेला जाग आलेली नाही. सदर विषय गरीबाशी निगडित असल्याने आणि त्यात सनसनाटी आणि टी.आर.पी. सारखे काहीच नसल्याने बहुतांश लोकांनी ह्या बातमीस ब्रेकींग किंवा मोठे मोठे प्रोग्रॅम करत फारसे… Read More »

रातोरात पोल्ट्री उभी ,झाले बागायत आणि नारळाच्या बागा : अतीचतुर शेतकऱ्यांना अखेर दणकाच

एका बाजूला विकास होत नाही म्हणून ओरडत राहायचे आणि दुसऱ्या बाजूला सरकारची फसवणूक करून स्वतःचा फायदा साधायचा असा दुटप्पी उद्योग बहुतांश लोकांकडून केला जातो. मग त्याला शेतकरी तरी अपवाद कसे राहतील ? . शेतकरी गरीबच हे चित्र साधारण उभे केलं जात मात्र सगळीकडे तशी परिस्थिती नाही . सरकारचा ड्रीम प्रोजेक्त असलेला समृद्धी महामार्ग महाराष्ट्रात तयार… Read More »

फेसबुक फ्रेंडच्या पहिल्याच भेटीचा ‘ असा ‘ झाला दुर्दैवी अंत : महाराष्ट्रातील घटना

जळगाव येथील रामानंदनगर मध्ये राहणाऱ्या एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलीशी फेसबुकच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळवून तिला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मागील जंगलात भेटण्यसाठी बोलवले आणि तिच्यावर बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोशल मीडियामधून मैत्री करून असे प्रकार याआधी देखील झाल्याचे उघडकीला आले आहे . आरोपीने ह्या मुलीशी फेसबुकवर मैत्री केली पुढे ह्याचे रूपांतर प्रेम संबंधात झाले… Read More »

नाशिकमध्ये मुलींची तस्करी.. बांगलादेशी तरुणीचे पोलिसांवर धक्कादायक आरोप

मुंबई पुणे आणि नंतर नाशिक ही झपाट्याने वाढणारी महाराष्ट्रातील शहरे असून गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये देखील नाशिकचे नाव पुढे येऊ लागले आहे . खून, चोऱ्या हे देखील आता जुने झाले मात्र नाशिकमध्ये चक्क मुलींची आणि महिलांची तस्करी होत असल्याचे आढळून आले आहे . एका बांगलादेशी तरुणीने यासंदर्भात आरोप केले आहेत . इतकेच नव्हे तर पैसे घेऊन मुलींना… Read More »

पिसाळलेल्या कुत्र्यांचा तब्बल नऊ जणांवर हल्ला : श्वानप्रेमींचे मौन

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव इथे पिसाळलेल्या कुत्र्यांने अचानक बऱ्याच नागरिकांवर हल्ला करून तब्बल नऊ जणांचे लचके तोंडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . पिसाळलेल्या कुत्र्यांने चावा घेतल्याने जखमी झालेल्यांमध्ये कृषी विभागातील अधिकारी वसंत नागरे यांच्या पत्नीचाही समावेश आहे तसेच बरीचशी शाळकरी मुले, महिला आणि वृद्ध मंडळीदेखील ह्या कुत्र्याची शिकार झाली. जखमी झालेल्या नागरिकांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु… Read More »

नाशिकच्या सिडकोमधील ‘ ह्या ‘ लाल बाटल्यांचे रहस्य नक्की काय ?

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेकडून काही विशेष कारवाई होत नाही. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे देखील प्रयोग करून झाले मात्र त्यालाही महापालिकेला काही मर्यादा येतात . प्राणीमित्र संघटना लगेच ओरड सुरु करतात . मात्र रस्त्यावर बेवारस मारून पडलेले प्राण्यांचे मृतदेह उचलायच्या वेळी हे प्राणीमित्र बघायला सुद्धा येत नाहीत तसेच भटक्या कुत्रांकडून माणसावर हल्ले झाले तरी प्राणीमित्र गप्प बसून… Read More »

आजपर्यंत साधी चिमणी मारली नाही, ‘ त्या ‘ वादग्रस्त व्हिडिओवर गिरीष महाजन यांचे स्पष्टीकरण

चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याच्या शोधासाठी सोमवारी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी बंदूक घेत वनविभागाच्या शोधमोहिमेत सहभाग घेतला होता . त्यावेळी गिरीष महाजन बंदूक घेऊन बिबट्याच्या मागे धावलायचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यावर नेटिझन्स कडून मोठ्या प्रमाणात गिरीष महाजन यांच्यावर टीका करण्यात आली होती. अखेर गिरीष महाजन यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या… Read More »