Category Archives: कोल्हापूर

रातोरात रस्त्यावर आणणारा गुगलचा नॉन्सेन्स प्रोग्रॅम : डाटाचोर गुगलच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश

केंब्रिज ऍनालिटिका आणि फेसबुक यांचा डेटा चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर आपण खरोखर इंटरनेटवर सुरक्षित आहोत का ? हा प्रश्न प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहणार नाही. अर्थात याचे दुर्दैवी उत्तर ‘ नाही’ असेच आहे. आता मुख्य म्हणजे आपला डेटा चोरतो तरी कोण आणि कशासाठी ? आपला डेटा तोच व्यक्ती किंवा कंपनी चोरते ज्यांना त्याचा काही फायदा आहे, म्हणजे… Read More »

महाबळेश्वरला हनीमूनला निघालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले : असा केला होता प्लॅन ?

नुकतेच लग्न होऊन हनीमूनला निघालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन पतीची हत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे . ह्या प्रकरणामध्ये सातारा पोलिसांनी नववधूसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. लग्नाआधी ह्या वधूचे एका दुसऱ्या व्यक्तीच्या सोबत प्रेमसंबंध होते मात्र तरीदेखील घरगुती दबावाने तिने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केले मात्र त्याचा यात नाहक बळी गेला. आनंद कांबळे… Read More »

पैशासाठी बायको आईला विकण्याचा सल्ला देणाऱ्या पाठक बाईंवर गुन्हा दाखल : कोल्हापूरचे प्रकरण

चित्र : प्रतीकात्मक लोन घ्या या लोन घ्या,या असे सांगत आपल्याला रोज फोन येत असतात मात्र लोन घेताना इतके बांधून घेतले जाते कि परतफेड होण्यास वेळ लागला तर वसुली वाल्यांकडून अत्यंत उद्दाम भाषा वापरली जाते किंवा घरातील वस्तू देखील प्रसंगी उचलून नेल्या जातात,मात्र कोल्हापूरमध्ये त्याच्यादेखील पुढील पातळी गाठली आहे . थकीत कर्ज भरले नसल्याच्या रागातून… Read More »

‘ ह्या ‘ कारणाने महाराष्ट्रात पेट्रोलपंप चालकांचा व्यवसाय मंदीत मात्र कर्नाटक गुजरात तेजीत

इंधनदरवाढीचा भडका वाढू लागल्यामुळे सर्वच वाहनधारक त्रस्त झाले आहेत. तर वाहतूक व्यवसाय करणारेही अडचणीत सापडले आहेत. राज्यात सर्वत्र अशी परिस्थिती असताना महाराष्ट्राच्या सीमेवरील कर्नाटक राज्यात मात्र पेट्रोलचक्क आठ रुपये, तर डिझेल दोन रुपये १५ पैशानी स्वस्त आहे. त्यामुळे सीमेवरील वाहनधारकांसह वाहतूक व्यावसायिक कर्नाटक राज्यातच टाक्या फुल्ल करीत आहेत. त्यामुळे सीमेवरील पेट्रोलपंप चालकांचा व्यवसाय भयानक मंदावला… Read More »

….. तर कोणत्याही क्षणी मंत्रालयात करणार आत्मदहन : अश्विनी बिद्रे-गोरे हत्याकांड प्रकरण

अश्विनी बिद्रे-गोरे हत्याकांडाच्या तपासाबाबत अजूनही कोणत्याही प्रकारची योग्य ती माहिती दिली जात नाही. तपासाची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोलीस पोहोचवत नाहीत. भाजप नेत्याच्या भाच्याला वाचवण्यासाठी आमचं सँडविच केलं जातं आहे, असे आरोप मयत अश्विनी बिद्रे-गोरे यांचे पती राजू गोरे यांनी केले आहेत. अश्विनी बिद्रे गोरे हत्येप्रकरणात कुटुंबीयांनी 5 नवीन मागण्या केल्या असून यामध्ये सदर केस फास्ट ट्रॅक… Read More »

प्रेम विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी चिरला पत्नीचा गळा : महाराष्ट्रातील घटना

आपल्या पसंतीचा नवरा असावा म्हणून प्रेमविवाह केला खरा मात्र प्रियकराने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बायकोचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रामध्ये घडला आहे . मांढरदेव ( सातारा ) घाटामध्ये खून झालेल्या महिलेची ओळख पटल्यानंतर ही धक्कादायक माहिती उघडकीस आली . बानू कोकरे (वय २३, रा. भिवंडी, मुंबई) असे खून झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी वाई… Read More »

शरद पवार यांच्याविरोधात बोलायची तुमची लायकी नाही : मुख्यमंत्र्यांवर पलटवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री असाल पण शरद पवार यांच्याविरोधात बोलायची तुमची लायकी नाही. तुम्ही दिवसा चहा पीत असला तरी रात्री कुठली आणि किती पिता हे माहीत आहे. काही करायचं पण राष्ट्रवादीचा नाद करायचा नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस आज… Read More »

देशाचे कृषिमंत्री कोण आहेत ? अजित पवार यांच्या प्रश्नांवर मिळाले ‘ हे ‘ उत्तर

छत्रपतींच नाव भाजप सरकारला फक्त सत्तेसाठी हवं आहे.छत्रपतीचं नाव घेवून काही समाजाला हाताशी धरुन काम करत आहे, हे आम्ही खपवून घेणार नाही. मतांसाठी याचं काम सुरु असल्याचा आरोप करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अठरापगड जातींना बरोबर घेवून जाणारा, महिलांना न्याय-सन्मान देणारा आणि शेतकऱ्यांना पुढे नेणारा पक्ष आहे असे अजित पवार यांनी भुदरगड (कोल्हापूर ) इथे… Read More »

भिडे समर्थकांची प्रकाश आंबेडकरांना अटक करण्याची मागणी : राज्यभर समर्थनार्थ मोर्चे

कोरेगाव भीमा च्या हिंसाचार प्रकरणी प्रथम आरोपी म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी ठपका ठेवलेले मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ बुधवारी राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. कोरेगाव-भीमा हिंसाचार सहभागाचा ठपका ठेवत संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही, असा दावा करत त्यांच्या समर्थकांचा दावा आहे… Read More »

अश्विनी बिद्रे यांच्या पतीने ‘ ह्या ‘ कारणावरून मागितली इच्छामरणाची परवानगी

सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खूनप्रकरणी अपेक्षित गतीने तपास होत नसल्याने अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीसह इच्छामरणासाठी परवानगी मागितली आहे. राष्ट्रपती, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि राज्यपालांना हे पत्र पाठवले आहे. गुन्ह्यातील सबळ पुरावे जमा करण्यात पोलिसांकडून चालढकल सुरू असल्याने बिद्रे-गोरे कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे. योग्य… Read More »