Category Archives: औरंगाबाद

रातोरात रस्त्यावर आणणारा गुगलचा नॉन्सेन्स प्रोग्रॅम : डाटाचोर गुगलच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश

केंब्रिज ऍनालिटिका आणि फेसबुक यांचा डेटा चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर आपण खरोखर इंटरनेटवर सुरक्षित आहोत का ? हा प्रश्न प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहणार नाही. अर्थात याचे दुर्दैवी उत्तर ‘ नाही’ असेच आहे. आता मुख्य म्हणजे आपला डेटा चोरतो तरी कोण आणि कशासाठी ? आपला डेटा तोच व्यक्ती किंवा कंपनी चोरते ज्यांना त्याचा काही फायदा आहे, म्हणजे… Read More »

जांब गावच्या हद्दीत वऱ्हाडाच्या टेम्पोला टँकरची जोरदार धडक :मोठी जीवितहानी

लातूर-मुखेड रस्त्यावर जांब गावच्या हद्दीत वऱ्हाडाच्या टेम्पोला टँकरने धडक दिली. या भीषण अपघातात तब्बल ११ वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जांब गावच्या हद्दीत सकाळी साडेनऊच्या सुमारास लग्नाच्या वऱ्हाडाच्या टेम्पोला टँकरनं जोरदार धडक दिली. यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती… Read More »

औरंगाबादमध्ये दोन गटांत वाद, दोघांचा मृत्यू पोलिसांच्या तीन गाड्या जाळल्याचे वृत्त

औरंगाबाद येथील मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून दोन गटांमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेत ३० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.तां जनतेस शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेकायदा नळ कनेक्शन तोडण्यावरून दोन… Read More »

हातात सलाईन घेऊन उभ्या राहणाऱ्या ‘ ह्या ‘ चिमुरडीचा फोटो तुम्हाला आला काय ? : काय आहे बातमी ?

राज्यातील आरोग्य योजनांवर कोट्यवधी रुपयांची तरतूद केल्याचा कितीही डांगोरा सरकार रोज पिटत असले तरी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत किती येते ही जबाबदारी मात्र सरकारची नाही का ? . रोज नवीन घोषणा सरकार दरबारी केल्या जातात मात्र, प्रत्यक्षात याचा फायदा तळागाळातील रुग्णांना होतो का, असा प्रश्न निर्माण करणारी घटना औरंगाबादमध्ये घडली. खुलताबाद तालुक्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात… Read More »

आणि ‘ अशा ‘ रीतीने राष्ट्रवादी काँग्रेसवर आली तोंडघशी पडण्याची वेळ

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेल्या रमेश कराड यांना आपल्या तंबूत दाखल करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडघशी पडण्याची वेळ आली. रमेश कराड यांना भाजपातून राष्ट्रवादीमध्ये आणण्यात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे या माध्यमातून धनंजय यांनी पंकजा मुंडे आणि पर्यायाने भाजपावर कुरघोडी केल्याची चर्चा होती. मात्र, अवघ्या… Read More »

चोरीचे ५०० ट्रक रंगरंगोटी करून विकायचा ‘ ह्या ‘ पक्षातील नगरसेवक : अखेर झाला गजाआड

चोरीचे तब्बल ५०० ट्रक आणि हायवेच्या गाड्या विकणाऱ्या टोळीतील औरंगाबाद येथील मुख्य आरोपी एमआयएम नगरसेवक जफर शेख याला पोलिसांनी रविवारी दुपारी बेड्या ठोकल्या. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई केली असून ह्याच प्रकरणात पोलिसांनी जफरचा भाऊ बाबर शेखला अटक केली होती. त्याच्याविरोधात शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयानं त्याला चार… Read More »

प्रियकराची नियत फिरल्यावर प्रेयसीने ‘ जे ‘ केले आणि प्रियकर २ मिनिटात नीट झाला: महाराष्ट्रातील घटना

प्रेम जमले पुढे दोघांमध्ये शारीरिक संबध प्रस्थापित झाले मात्र थोड्या दिवसात प्रियकराची नियत फिरली आणि तो विवाहाला टाळाटाळ करू लागला . प्रेयसीच्या हे लक्षात येताच तिने जे पाऊल उचलले त्याने प्रियकर लगेच लग्नाला तयार झाला. प्रियकर लग्नाला तयार झाल्याने त्याच्याविरोधात चार दिवसापूर्वी नोंदविलेली बलात्काराची फिर्याद ३६ वर्षीय महिलेने मंगळवारी मागे घेतली. गैरसमजुतीने आपण ही तक्रार… Read More »

सौदी अरेबियातील स्फोट घडवणारा सुसाइड बॉम्बर महाराष्ट्रातील ‘ ह्या ‘ जिल्ह्यातील

सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 2016 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामागे महाराष्ट्रातील बीडमधील फय्याझ कागझी या तरुणाचा हात असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे . मूळचा बीड येथील रहिवासी असलेला फय्याझ कागझी पळून गेला होता .सौदी अरेबियातील हा एक आत्मघातकी हल्ला होता. आत्मघातकी स्फोटात ठार झालेल्या दहशतवाद्याचे डीएनएचे नमुने फय्याझच्या कुटुंबाशी जुळल्याने हा हल्ला काझगीनेच घडवल्याचे स्पष्ट झाले… Read More »

पोरगी पळवतो काय ? प्रेमप्रकरणातून काढली गावभर शेंदूर फासून धिंड : महाराष्ट्रातील घटना

प्रेमप्रकरणातून तरुणाची शेंदूर फासून गावभर धिंड काढल्याची धक्कादायक घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली आहे . बीड जिल्ह्यातील शिरुर (कासार) तालुक्यातील आर्वी येथे ही दुर्दैवी घटना घडली. प्रेम प्रकरणातून मुलीला पळवून नेल्याच्या आरोपातून मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केली. यानंतर त्याचे कपडे फाडले आणि त्याला गुलाल-शेंदूर फासून गावभर त्याची धिंड काढली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी… Read More »

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा राजकीय धक्का : आणखी एक भाऊ राष्ट्रवादीत

राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक रमेश कराड यांना आपल्या गटात ओढण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले असून ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत . रमेश कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातील होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या भावासारखे ते होते .… Read More »