आरुषी मर्डर मिस्त्री इतक्याच गूढ अशा भारतातील इतर ‘ पाच ‘ केसेस

By | October 13, 2017

cases similar to arushi murder case

आरुषी हत्याकांडाचा निकाल तर आला ,ज्याने पूर्ण देश ढवळून निघाला होता .मात्र अजूनही आरुषी आणि हेमराजची हत्या कोणी केली हे स्पष्ट झालेला नाही.. आरुषीच्या आईवडिलांना जरी निर्दोष ठरवलं असल तरी हा प्रश्न अजून कायम आहे कि आरुषी आणि हेमराजला कोणी मारलं ? भारतात आणखी देखील काही केसेस अशा आहेत ज्यांना मोठ्या प्रमाणात मीडिया कव्हरेज मिळालं त्यात काही केसेसचा निकाल आलाय तर काही केसेस पेंडिंग आहेत . नजर टाकूया अशाच काही केसेस वर

 1. शीना बोरा हत्याकांड
  शीना बोरा नावाच्या मुलीची हत्या , एप्रिल २०१२ ला होते, हत्या झालयावर ३ वर्षांनी केस ओपन केली जाते . संशयाची सुई सावत्र आई आणि सावत्र वडील मीडिया स्टार पीटर मुखर्जी यांच्यावर . आधी मुंबई पोलीस तपास करत असतात पण पुढे केस सीबीआयकडे सुपूर्त : स्टेटस : पेंडिंग
 2. सुनंदा पुष्कर यांचा गूढ मृत्यू
  १७ जानेवारी २०१४ रोजी काँग्रेस चे नेते व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा गूढ मृत्यू होतो . त्याचे प्रेत दिल्ली मधील एका हॉटेल मध्ये सापडते . मूळ काश्मीरची असलेल्या सुनंदा पुष्कर यांचे वडील पी.एन. दास हे भारतीय सेनेमध्ये वरिष्ठ अधिकारी होते . शशी थरूर यांचे हे ३ रे लग्न होते . एम्स च्या रिपोर्ट प्रमाणे सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू ड्रग चा ओव्हरडोस झाल्याने झाला . सध्या दिल्ली पोलिसांचे एक विशेष पथक सुनंदा पुष्कर मृत्यूची केस हॅण्डल करत आहे .
 3. रिजवानुर रहमान मृत्यू
  २१ डिसेंबर २००७ ला रिजवानुर रहमान यांचा मृतदेह कलकत्ता रेल्वे ट्रॅकवर सापडतो. संशयाची सुई रिजवानुर रहमान यांची पत्नी प्रियंका तोडी यांचे वडील व उद्योगपती अशोक तोड़ी यांच्याकडे फिरते . सध्या केस सीबीआय कडे आहे .
 4. निठारी हत्याकांड
  २९ डिसेंबर २००६ ला नोएडा मधील पंधेर येथून एका घराच्या पाठीमागे असलेल्या नाल्यामधून पोलिसांनी १९ मानवी कवट्या जप्त केल्या होत्या . या प्रकरणी सीबीआयच्या स्पेशल ब्रँच ने घरमालक मोनिंदर सिंह पंढेर आणि त्याचा नोकर सुरिंदर कोळी याला फाशीची शिक्षा सुनावली होती . पंढेर आणि कोळी यांच्यावर २० वर्षाची पिंकी सरकार हिची बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप आहे . केस अजून चालू आहे .
 5. शिवानी भटनागर मर्डर केस
  इंडियन एक्सप्रेस मध्ये काम करणारी पत्रकार शिवानी भटनागर यांची २३ जानेवारी १९९९ ला त्याच्या राहत्या अपार्टमेंट मध्ये हत्या करण्यात आली . तब्बल ९ वर्षांनी १८ मार्च २००८ ला ह्या केस चा निकाल लागून माजी आईपीएस अधिकारी रविकांत शर्मा व इतर व्यक्तींना दोषी ठरवण्यात आलं . पुढे ऑक्टोबर २०११ ला दिल्ली हायकोर्टाने रविकांत शर्मा व इतर दोन जणांनी मुक्तता केली, मात्र एक जणाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली .

?पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply