काल रात्री गाड्यांची तोडफोड ‘ ह्या ‘ परिसरात : बातमी पुण्याची

By | October 7, 2017

car damaged pimpri pune

गाड्यांच्या तोडफोडीच्या घटना पुणेकरांना तशा नवीन नाहीत . याआधी देखील रात्री गाड्या जाळण्याचे व काचा फोडण्याचे प्रकार घडले आहेत . काल रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहनांच्या तोडफोडीची घटना समोर आली आहे. निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील घरकुल वसाहतीमध्ये पाच ते सात वाहनांची तोडफोड करण्यात आली. यात दोन बसेसचा देखील समावेश आहे.

कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमावेळी ह्याच परिसरात दोन गटात वाद झाला होता. या वादातून रात्री वाहनांची तोडफोड करण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज आहे ,असे पोलिसांचे म्हणणे आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही तरुणांमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. तेव्हा तिथे हा वाद मिटला होता . मात्र, काल रात्री याच वादातून ७ ते ८ तरुणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . या तोडफोडीत दोन बस, आणि छोट्या चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तोडफोड प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

वैयक्तिक भांडणाचा राग असा दुसऱ्यांच्या गाड्यांवर काढणे कितपत योग्य आहे याचा विचार ह्या व्यक्तींनी केला पाहिजे .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?