अबब ..असा विचित्र अपघात की कार शिरली डायरेक्ट दुसऱ्या मजल्याच्या भिंतीत

By | January 15, 2018

car goes on 2nd floor after accident

आजपर्यंत आपण अपघात झाला कि साधारण गाडी गाडीला धडकली किंवा गाडी दरीत पडली , नदीत पडली असे ऐकत असतो. पण कार धडकून चक्क दुसऱ्या मजल्यावर पोहोचली असे आपल्याला कोणी सांगितले तर आपला विश्वास बसणार नाही. मात्र अशी एक घटना कॅलिफोर्नियामध्ये झाली आहे . ह्या धडकेत कार केवळ दुसऱ्या मजल्यावरच पोहचली नाही तर चक्क तिथे भिंत तोडून आता निम्मी अडकून राहिली. या घटनेचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे .

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियाच्या वेळेप्रमाणे सकाळी ५.३० वाजता एक अपघात झाल्याचा फोन दलाकडे आला. लगेच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले. त्यानंतर समोरील दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.अतिशय वेगात असलेली कार दुभाजकावर आदळली. आदळल्यानंतर कार वेग प्रचंड असल्याने जागेवर उडाली आणि ती इतकी इंच उडाली कि दुसऱ्या मजल्यावरील डेंटिस्टची भिंत तोडून निम्मी आत अडकून राहिली . मात्र ह्या जोरदार धडकेने आग लागली आणि मग अग्निशामक दलास पाचारण करावे लागले. ह्या वेळी कार मध्ये २ जण होते. चालक योग्य पद्धतीने गाडी चालवत नव्हता व तो नशेत असल्याचे देखील सांगण्यात आले.

त्यातील एक जण थोडी खटपट करून लगेच कारच्या बाहेर पडला मात्र दुसरा व्यक्ती तब्बल एक तासाहून जास्त वेळी कारमध्ये अडकून बसला होता . अग्निशामक दलाने त्याची सुटका केली आणि त्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे . कारची धडक इतकी जबरदस्त होती जी दुसऱ्या मजलायवरील कार भिंत तोडून आत शिरली आणि ती काढण्यासाठी अवजड यंत्राचा वापर करावा लागला. मात्र त्या डेंटिस्टच्या हॉस्पिटलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ऑरेंज काऊंटी फायर अथॉरिटीने बिल्डिंगमध्ये घुसलेल्या कारचा फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सफेद रंगाची सेडान कार इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचली. हा अपघात इतका भयानक होता की कार इमारतीला धडकताच आग लागली.विशेष म्हणजे ह्या अपघातात कोणतिही प्राणहानी झाली नाही हे नशीब म्हणावे लागेल. त्या डेंटिस्टचे क्लिनिक देखील सकाळ असल्याने उघडलेले नव्हते .नाहीतर मोठ्या प्रमाणात प्राणहानी देखील होण्याची शक्यता होती . नशा आणि कारचा स्पीड अधिक असल्याने हा अपघात झाला असे पोलीस व अग्निशामक दलाचे म्हणणे आहे.

कोण लागतो हा उमर खालिद तुमचा ? उमर खालिदचा पायचाटेपणा करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा

जिग्नेशचे बालिश राजकारण..असे किती आले किती गेले : प्रकाश आंबेडकर

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा