आपणसुद्धा भारी मशरूम खाऊन गोरे होऊ शकतो का ? : ‘ हे ‘ आहे उत्तर

By | December 14, 2017

can mushroom make you fair pros of cons of eating mushroom1

अल्पेश ठाकूर यांनी मोदींना मशरूम खाऊन मोदी गोरे झालेत असे म्हटले आणि मशरूम बद्दल लोकांचे कुतूहल वाढले . पण अल्पेश ठाकूर यांचा हा युक्तिवाद किंवा माहिती खरी आहे का ? की हा एक चुनावी जुमला आहे . अल्पेश ठाकूर म्हणाले होते , गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी बऱ्यापैकी सावळे होते. तेव्हापासूनच ते तैवानवरून आयात केलेले महागडे मशरूम खात आहेत. 80 हजार रुपयांचा एक असे पाच मशरूम दररोज खाल्ल्यामुळेच मोदी यांचा रंग उजळला असून ते टुमटुमीत झालेत.

तर जाऊन घेऊ या कि आपण देखील मशरूम खाऊन गोरे होऊ शकतो का ? जर मशरूम खाऊन गोरे होता येत असेल तर किती फेअरनेस क्रीमचा काही उपयोगच नाही असे म्हणावे लागेल. तर जाऊन घेऊया थोडे मशरूम बद्दल.

  1.  प्राचीन काळी लोकांना मशरूम जादूनं येतात असं वाटायचं कारण ते एका रात्रीत उगवत असत.
  2. मशरूमच्या असंख्य प्रजाती उपलब्ध असल्या तरी त्यातल्या काहीच खाण्यायोग्य असतात. विषारी मशरुम खाण्यानं माणसाचा मृत्युही होऊ शकतो. अर्थात मशरूम पाहून विषारी कि बिनविषारी काहीच काळत नाही त्यामुळे माणसांनी शेतात उगवलेले मशरुम खाण्याचा सल्ला दिला जातो.
  3. मशरूमचे शरीराला होणारे फायदे अनेक आहेत. कर्करोगांपासून प्रतिकार करण्याची क्षमता मशरूममध्ये आहे असं काही संशोधनाद्वारे स्पष्ट झालं आहे. मशरूम मानवी गुणसूत्रांना कर्करोगाच्या पेशींपासून होणारा धोका टाळू शकतात.
  4. मशरूमध्ये ब आणि ड जीवनसत्त्वांचा मोठा साठा असतो. ब जीवनसत्त्व मेंदू आणि मज्जातंतूचं काम सुरळीत होण्यासाठी गरजेचं असतं तर ड जीवनसत्त्व दातांच्या आणि तसेच हाडांच्या मजबुतीसाठी महत्वाचे असते.
  5. मशरूममुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
  6. मशरूममध्ये झिंक मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे कामेच्छा वाढते आणि लैंगिक आरोग्यही सुधारतं.
  7. मशरूम मध्ये अॅन्टीऑक्सिडंटस देखील असतात त्यामुळे चेहरा तजेलदार दिसतो.मात्र गोरा बिरा होत नाही
  8. मशरूममध्ये जवळपास 90 टक्के पाणी असतं त्यामुळे शरीरात पाण्याची पातळी राखायलाही मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मशरूम खायला एकदम छान लागतात, त्यामुळे खाणाऱ्यालाही ते कायम खावेसे वाटतात.
  9. मशरूम कच्चे खाल्ले तर पचनसंस्था सुधारते.
  10. मशरूममध्ये असणारा रिबोफ्लोक्सिन नावाचा घटक शरीरातल्या लाल रक्तपेशींचं प्रमाण मर्यादित ठेवतं आणि त्वचेचा पोतही सुधारतो. मात्र गोरे होणे याच्याशी ह्या घटकांचा काही संबंध नाही .

आता आपल्या लक्षात आलेच असेल कि, मशरूम खाल्ल्याने कोणी फेअरनेस क्रीम लावल्यासारखं गोरं दिसत नाही .त्यामुळे अल्पेश ठाकूर यांच्या अल्प गोष्टींना जास्त महत्व न देता आपण मशरूम आपल्या चांगल्या आरोग्यासाठी एन्जॉय करूयात.

मी चहा विकला पण ………. : मोदी काँग्रेसवर भडकले

नरेंद्र मोदींची चामडी सोलून काढू : ‘ ह्या ‘ नेत्याचे धक्कादायक विधान

लिहणार नव्हतो पण राहवलं नाही म्हणून लिहतोय : कथा एक पोलीस सस्पेंड झाल्याची

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?