पोलिसांना चकमा देण्याची ‘अनोखी ‘ शक्कल लढवून गुन्हेगार पसार : भायखळा कारागृहातील घटना

By | May 8, 2018

byculla jail kaidi farar

पोलीस असल्याचे भासवत एका न्यायबंदी आरोपीने भायखळा कारागृहाचे सुरक्षा कवच तोडून पळ काढल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे . हा आरोपी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटकेत होता. आसिफ माजीद शेख असे आरोपीचे नाव आहे. तो चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. भायखळा कारागृहाचे तुरुंगाधिकारी दत्तात्रय खांडेकर (४७) यांच्या फिर्यादीवरुन आरोपी शेख विरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आसिफ माजीद शेख याचा पोलीस शोध घेत असून तो लवकरच हाती येईल,यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

भायखळा कारागृहातील अधिकाऱ्यांच्या वसाहतीत कुटुंबासोबत राहत असलेले खांडेकर हे गेल्या वर्षीच्या आॅक्टोबरपासून भायखळा कारागृहाचे तुरुंगाधिकारी आहेत. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे हजर झाले. दैनंदिन कर्तव्यानुसार कारागृह कर्मचाºयांकडून शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कारागृहातील कैदी आणि न्यायबंदीची मोजदाद करण्यात आली. यात त्यांना न्यायबंदी आरोपी शेख गायब असल्याचे निदर्शनास आले. कर्मचाºयांनी लगेच ही बाब खांडेकर यांच्या कानावर घातली. त्यांनी कारागृहातील अधिकारी, कर्मचाºयांच्या मदतीने संपूर्ण कारागृह पिंजून काढले; मात्र शेख सापडला नाही. अखेर शेख पसार झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी खांडेकर यांनी नागपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार अधिक तपास करत असल्याची माहिती नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बसवत यांनी दिली आहे.

  • आसिफ माजीद शेख फरार झाला कसा ?

शेख हा चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या अचानक गायब होण्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अशात अनेकदा पोलीस आरोपींना कारागृहात सोडण्यासाठी सिव्हिल कपड्यांमध्ये येतात. याचाच फायदा घेत आरोपी पसार झाला असावा याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.दुसरीकडे पीडब्ल्यूडीकडून कारागृह परिसरात काम सुरु आहे. येथीलच भिंतीवरुन देखील कदाचित तो पसार झाला असावा अशी देखील शक्यता आहे. मात्र ह्या घटनेमुळे भायखळा कारागृहातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. कारागृह विभागातून या प्रकरणावर कमालीची गुप्तता पाळण्यात येत असून या घटनेमुळे भायखळा कारागृह पुन्हा चर्चेत आले आहे.मात्र पोलिसांच्या यंत्रणेवर एक प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे यात वाद नाही.

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

भोंदूबाबा हैदरअली शेखवर बलात्काराचा आणखी एक गुन्हा: केला विकृतीचा कळस

अश्लील चित्रफीत दाखवून मौलानाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार : महाराष्ट्रातील घटना

रक्ताच्या बदल्यात मागितले शरीरसुख : महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

चुलत दिराकडून भावजयीवर तब्बल एक वर्षे अत्याचार : वाच्यता केल्यास द्यायचा ‘ ही ‘ धमकी

प्रेमविवाहासाठी धर्मांतर मात्र तरीही नव्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून :महाराष्ट्रातील घटना

अनैतिक संबंध बंद होत नसल्याने पत्नीने पतीला पेटवले: महाराष्ट्रातील घटना

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

प्रियकराच्या सोबत राहण्यासाठी ह्या बाईने जे केले ..विश्वास पण ठेवू शकणार नाही

पत्नीच्या विवाहबाह्य प्रेमप्रकरणाला कंटाळून पतीची आत्महत्या : सुसाईड नोटमध्ये लिहले असे काही ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा