फ्रांस आणि बेल्जियम नंतर ह्या देशातही बुरख्यावर बंदी

By | October 1, 2017

burqa banned austria

फ्रांस मध्ये बुरख्याला बंदी घातल्यानंतर आता आणखी एका देशातही बुरखा घालण्यास बंदी करण्यात आली आहे . हा नवीन नियम येत्या रविवार पासून लागू होणार आहे . सामाजिक मूल्यांचा हवाला देत सरकारने यावर बंदी आणली आहे .. ह्या देशाचे नाव आहे ऑस्ट्रिया. ह्या नवीन नियमाची अंमल बजावणी ह्या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून करण्यात आलेली आहे, ज्याचा कट्टर राष्ट्रवादी पार्टी फ्रीडम पार्टीला फायदा होऊ शकतो .

मुस्लिम समाजाने मात्र याची निंदा केली आहे कारण ऑस्ट्रियामध्ये तसेही खूप कमी महिला बुरखा वापरतात . मात्र फक्त मुस्लिम बुरख्यावरच बंदी आहे असे नाही तर इतरही फेस मास्क व जोकरसारख्या मेकअप वर देखील बंदी आहे . मात्र ऑस्ट्रिया च्या पर्यटन विभागाचे म्हणणे आहे कि याने मुस्लिम देशातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो . फ्रांस आणि बेल्जियम ने २०११ पासूनच बुरख्यावर बंदी घातली आहे आणि नीदरलैंड्स मध्ये बुरखा बंद करण्यासाठी प्रयन्त चालू आहेत . ब्रिटन मध्ये मात्र बुरख्यावर कोणतीही बंदी नाही .

#नक़ाब आणि #बुरखा यात काय आहे फरक

नक़ाब मध्ये डोळ्यांच्या जवळची जागा मोकळी असते, म्हणजे नक़ाब असेल तर डोळे आणि भुवया दिसू शकतात . काही नकाबला समोरून जाळी अधिक लावावी लागते आणि डोक्यावर वेगळा स्कार्फ बांधावा लागतो .
या उलट बुरख्या मध्ये , शरीराचा कोणताच भाग दिसत नाही आणि हा पूर्ण एक सेट असतो. ज्यात चेहरा व पूर्ण शरीर झाकले जाते . फक्त डोळ्याच्या समोर एक जाळी असते, त्यातून बाहेरचे दिसू शकते .

@@पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा @@