लग्नाच्या वादातून भरदिवसा तरुणीवर केले सपासप वार : तरुणीचा जागीच मृत्यू

By | November 25, 2017

boyfriend kills girlfriend over dispute of marriage in amravati maharashtra

अमरावती शहरातील एका युवतीसोबत विवाह केल्याचा दावा करत त्याच युवकाने त्या युवतीचा भरदिवसा रस्त्यात खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. २३) घडली. या घटनेने अमरावती हादरून गेले .मृत तरुणींसह आपला विवाह झाला असल्याचा ह्या युवकाचा दावा आहे. मात्र खुनाचे कारण काय आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. ह्या हल्लेखोर तरुणाचे नाव राहुल बबन भड असे असून तो मुदलियारनगर चा रहिवासी आहे.

अमरावतीतील साईनगर परिसरात प्रतीक्षा मुरलीधर मेहत्रे (वय २४, रा. छाबडा प्लॉट) ह्या युवतीचा निर्दयीपणाने चाकूने वार करून खून करण्यात आला. राहुलने प्रतीक्षासोबत आपला विवाह झाल्याचा दावा केला होता. परंतु, ती आपल्या घरी येत नसल्याने तिला आपण नांदवायला तयार आहोत, अशी याचिकासुद्धा त्याने न्यायालयात दाखल केली होती मात्र, त्याला अधिकृतरीत्या कुठेही दुजोरा मिळालेला नाही. दुसरीकडे, राहुलकडची प्रमाणपत्रे खोटी आहेत असे प्रतिक्षाच्या वडिलांचे म्हणणे आहे. यापूर्वी देखील, प्रतीक्षाने ऑक्‍टोबर महिन्यात फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात राहुलविरुद्ध तक्रार करून त्याने सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करून राहुल माझी बदनामी करत असल्याचे म्हटले होते. या प्रकरणात राहुलविरुद्ध आय. टी. ॲक्‍टनुसार गुन्हासुद्धा दाखल झाला होता, मात्र ठोस काही कारवाई न झाल्याने ह्यात नाहक प्रतिक्षाचा बळी गेला.

राहुल बांधकाम कंत्राटदार होता, अशी माहिती पुढे येते आहे. मात्र नक्की खरे काय आहे हे अजूनही गुलदस्त्यात आहे. विवाह सिद्ध करण्यासाठी त्याचा आटापिटा का सुरू होता ? हे देखील पोलिसांना आता शोधून काढावे लागेल. काही राजकीय पक्षाच्या मंडळींनी राजापेठ पोलिस ठाण्यावर धाव घेऊन प्रतीक्षाच्या मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी केली. या प्रकरणात उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती.यामुळे खून झाल्यानंतर तरी राहुलला तत्काळ अटक करावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे. हल्लेखोर राहुलच्या दाव्यात किती दम आहे हे चौकशीअंती निष्पन्न होईलच मात्र एकाएकी अशी वेळ का यावी ? आणि असे होण्यामागची करणे काय आहेत हे शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

अशा झाला घटनाक्रम

प्रतीक्षा आपल्या मैत्रिणीसोबत मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन करून त्या दोघी दुचाकीने परतत होत्या. त्याचवेळी मागून दुचाकी घेऊन राहुल भड आला. राहुलने प्रतीक्षाच्या दुचाकीला धक्का मारून दुचाकी थांबवायला सांगितले. ती दुचाकी थांबवून उभी होती, इतक्यात अचानकपणे राहुलने बॅगमधून चाकू काढून प्रतीक्षाच्या गळ्यावर, छातीवर पोटावर वार केले. त्यानंतर राहुल घटनास्थळावरून पसार झाला. प्रतिक्षाची मैत्रीण श्वेताने आरडाओरड केल्यामुळे नागरिकांंनी प्रतीक्षाला गंभीर अवस्थेत इर्विन रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत सर्व काही संपले होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रतीक्षा आणि राहुल यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेम संबंध होते.त्यातून दोघांमध्ये कायदेशीर वाद सुरु होते. एप्रिल महिन्यात कौटुंबिक न्यायालयात राहुलने याचिका दाखल करून प्रतीक्षा पत्नी असून ती नांदायला तयार नाही, अशी याचिका दाखल केली होती. मात्र हा दावा व कागदपत्रे खोटी असल्याचे प्रतीक्षाच वडील सांगत आहेत. दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या होत्या. नंतर त्या मागे घेण्यासही ते तयार झाले होते. मात्र ह्या प्रेमप्रकरणाचा असा दुर्दैवी अंत होईल असे कोणालाही वाटले नव्हते.पोलीस राहुल च्या शोधासाठी अकोला, अमरावती शहरात पथके रवाना झाली आहेत.

सर्वसामान्य कुटुंबातील प्रतीक्षा अभ्यासात हुशार होती. तिने बुद्धिमत्तेच्या जोरावरच ‘एमएससी’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. मात्र गुरुवारी राहुलने या गुणी तरुणीचे सर्वस्व संपवून टाकले. प्रतिक्षासोबतलग्न करण्याची मागणी घालण्यासाठी मार्च महिन्यात राहुल त्याच्या नातेवाइकांना घेऊन प्रतीक्षाच्या घरी गेला होता. मात्र, त्यावेळी प्रतीक्षाच्या कुटुंबीयांनी राहुलला लग्नासाठी नकार दिला होता. त्यानंतर पुढच्याच महिन्यात राहुलने कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल करून प्रतीक्षा आपली रितसर पत्नी असून तिने नांदण्यासाठी यावे, असा अर्ज दाखल केला होता.पोलिसांनी राहुलच्या एका नातेवाइकाकडून राहुल प्रतीक्षाच्या लग्नाचे प्रमाणपत्र जप्त केले आहे. मात्र ते प्रमाणपत्र कुणी दिले, त्यांचे लग्न कधी झाले. त्यावर असलेला मजकूर नेमका काय आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

तू मला का फसवलेस असा व्हाटसऍप संदेश टाकून तिने जीवन संपले : प्रेमप्रकरणातून केली आत्महत्या

अखेर तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवले : पुणे जिल्ह्यातील घटना

विवाहबाह्य संबंधास अडथळा ठरणाऱ्या बायकोचा पाचव्या मजल्यावरून ढकलून खून

प्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला

महिलांकडे एक खाजगी मालमत्ता म्हणून बघण्याची पुरुषसत्ताक मानसिकता जोवर संपत नाही तोवर असे दुर्दैवी हल्ले कमी होणार नाहीत. महिला ह्या सुद्धा माणूस आहेत ही भावना अशा विकृत लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

? सहमत असाल तर लाईक करा शेअर करा ?