सांगलीजवळच्या डोंगरात नरबळीचा प्रकार ? : मूर्तीसमोर आढळला मृतदेह

By | November 19, 2017

body of person found on temple in sangli shirala

सांगलीतील शिराळा तालुक्यात शिरसी येथील चक्रभैरव मंदिरात एका व्यक्तीचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला. चक्रभैरव मूर्तीसमोरच हा मृतदेह आढळला असून मृत इसमाचे वय ४०-४५ असल्याचे समजते . पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रथम दर्शनी नरबळीचा प्रकार आहे . मात्र इतरही शक्यता पोलीस तपासून पाहत आहेत.

अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयाच्या पुरुषाचा हा मृतदेह आहे. शिराळा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कौर्याची परिसिमा, माणुसकीला काळिमा हे शब्दही अपुरे पडतील, अशा पद्धतीने या व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे .चक्रभैरव मूर्तीसमोरूनच मंदिरात रक्ताचा पाट वाहिल्याचे चित्र दिसून आहे.

सांगलीतील शिराळा तालुक्यातील डोंगरावरील चक्रभैरव मंदिरात ४०-४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. मृतदेहाच्या बाजूला लिंबू, काळी बाहुली सापडल्याने नरबळीचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

शिराळा तालुक्यात शिरसी शिवरवाडी येथे रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर एक डोंगर असून इथे चक्रभैरव मंदिर आहे. निवांत असल्याने तशीही इथे फार मोठी अशी वर्दळ नसते. सध्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरु असल्याने मजूर कामावर येतात . शनिवारी सकाळी मजूर कामासाठी मंदिरात गेला. त्याला मंदिराच्या गाभाऱ्यात ५० वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याने तात्काळ ह्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मात्र अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या बाजूला काळी बाहुली, लिंबू असे करणीसाठी लागणारे साहित्य पडले होते, त्यात शुक्रवारी अमावस्या देखील होती, त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा अशी प्राथमिक शक्यता आहे. डोक्याच्या मागील बाजूवर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. मृतदेहाच्या खिशात एक तिकीट सापडले असून त्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र नरबळी च्या नावाखाली पोलिसांची दिशाभूल तर केली जात नाही ना ? ही देखील शक्यता पोलीस तपासून पाहत आहेत.

कितीही विज्ञान पुढे गेले तरी काही लोक अजूनही आपली जुनी मानसिकता सोडायला तयार नाहीत. काळी जादू आणि करणी असे काहीच नसते असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कितीही ओरडून सांगितले, कायदा केला तरी देखील मनावरचा लोकांचा पगडा कसा कमी करायचा हा मोठा प्रश्न आहे .

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?