#ब्रेकिंग: जम्मू काश्मीरमधील मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा भाजपने काढला : सरकार अल्पमतात काय आहे परिस्थिती ?

By | June 19, 2018

bjp withdraw support of mufti sarkar kashmir

महबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. जम्मू-कश्मीर बीजेपीचे प्रभारी राम माधव यांनी प्रेस कॉन्फ्रेंस मध्ये घोषणा केली मात्र कारण देताना त्यांनी काश्मीर खोऱ्यात प्रेसचे स्वातंत्र्य धोक्यात आहे असे कारण सांगितले आहे .भाजपाचे नेते राम माधव यांनी या आज दुपारी दिल्लीमध्ये या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे राज्यातील महबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आले आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभेतील सध्याचे संख्याबळ खालीलप्रमाणे आहे.

पीडीपी – २८
भाजपा – २५
काँग्रेस – १२
नॅशनल कॉन्फरन्स – १५