मुसलमानांना स्वत:ची लोकसंख्या वाढवून भारतात वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे : भाजपच्या आमदाराचा आरोप

By | January 2, 2018

bjp mla says muslims increasing population to take over india

मुसलमानांना स्वत:ची लोकसंख्या वाढवून भारतात वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. त्यामुळेच मुस्लिम जोडपी डझनभर मुलं जन्माला घालतात, असे भाजपचे आमदार बनवारीलाल सिंघल यांचे म्हणणे आहे. बनवारीलाल सिंघल हे राजस्थानच्या अलवार (शहरी) मतदारसंघाचे आमदार आहेत. सिंघल यांनी त्यांच्या फेसबुकवर असा मजकूर पोस्ट केला होता .

देशातील हिंदूंपेक्षा स्वत:ची लोकसंख्या वाढवण्यासाठी मुस्लिम लोक डझनभर मुलं जन्माला घालतात. असे करून त्यांना देशात वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे, असे सिंघल यांनी पोस्ट मध्ये म्हटले होते. त्यानंतर त्यावर मोठा वाद पेटला. काही जणांनी सिंघल यांनी ह्या वादग्रस्त विधानाबद्दल माफी मागितली पाहिजे असा देखील आग्रह धरला, मात्र सिंघल यांनी माफी तर मागितली नाहीच वरती आपल्या विधानाचे समर्थन केले व अजून एक वादग्रस्त विधान केले.

ते म्हणाले, एखाद्या जोडप्याला जास्त मुलांना जन्म देता येणे शक्य नसेल तर मुस्लिम पुरूष दुसरं लग्न करायलाही मागेपुढे पाहत नाहीत. त्यासाठी मग बिहार आणि पश्चिम बंगालमधून मुली विकत घ्याव्या लागल्या, तर मुस्लिम पुरूष ते सुद्धा करतील. अल्वरमध्ये अशा प्रकारची कित्येक उदाहरणे देखील सापडतील असेही ते म्हणाले.

सिंघल आपल्या विधानाचे समर्थन करण्यासाठी यति नरसिंह नंद सरस्वती यांनी देशातील लोकसंख्येच्या सांख्यिकी विश्लेषणाचा दाखला देतात. यति नरसिंह नंद सरस्वती म्हणाले होते की ज्या देशात मुस्लिमांची लोकसंख्या ३० टक्केपेक्षा जास्त होते त्या देशात मुस्लिमांचे वर्चस्व प्रस्थापीत होते . हिंदू लोक हे कमी मुले व आपल्या मुलांचे संगोपन जास्तीत जास्त चांगले कसे होईल याकडे लक्ष देतात तर मुस्लिम लोक केवळ जास्तीत जास्त मुले जन्माला घालून आपली लोकसंख्या कशी वाढवता येईल याकडे लक्ष देतात . त्यांना शिक्षण विकास व संगोपन यांच्याशी काही घेणे देणे नसते .

सिंघल पुढे म्हणतात, मुस्लिम लोक पद्धतशीरपणे आपली लोकसंख्या वाढवत आहेत. त्यामुळे भविष्यात देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि बहुतांश राज्यांच्या मुख्यमंत्रिपदी मुस्लिम व्यक्तीच असतील, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सर्वच पक्षात फक्त निवडणुकीच्या वेळी नव्हे तर कायमच वादग्रस्त अशी विधाने करून चर्चेत राहण्याची सवय लागलेले नेते आहेत. आपल्या वाचाळ पणामुळे सामाजिक स्वास्थ धोक्यात येते याची यांना थोडी देखील जाणीव नसते. यापूर्वी ओवेसी यांनी देखील हिरव्या रंगाबद्दल वादग्रस्त विधान केले होते .

पोलिसांची ‘ ह्या ‘ मदरश्यावर धडक कारवाई : तब्बल ५१ मुलींना ठेवले होते डांबून

अखेर ट्रिपल तलाक होणार हद्दपार :ओवेसी यांना मिळाली लाजिरवाणी मते

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

केरळमधील लव्ह जिहादचे वारे पुणे नगरमध्ये : विकृत प्रेमवीरास पुणेमध्ये धरले

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?