तसं नाही तर ‘ असं ‘ ..सत्तेसाठी हपापलेल्या भाजपचा मास्टरप्लॅन : कर्नाटक विधानसभा निवडणूक

By | May 16, 2018

bjp masterplan for karnataka

कर्नाटक विधानसभेत बहुमताचा आकडा गाठता आला नसतानाही, भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. इतकंच नव्हे तर, भाजपाचे विधिमंडळ नेते म्हणून नियुक्ती झाल्यानंतर, बीएस येडियुरप्पा यांनी उद्याच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केलाय. त्यांचा हा आत्मविश्वास पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. मात्र, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आखलेली रणनीती यशस्वी झाल्यास ते काँग्रेस-जेडीएसला नक्कीच धक्का देऊ शकतात असे देखील बोललं जातंय .

कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी भाजपाने दोन ‘प्लॅन’ तयार केलेत. बहुमत सिद्ध करताना, काँग्रेस आणि जेडीएसचे १५ आमदार गैरहजर राहतील, यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसं झाल्यास, विधानसभेचं संख्याबळ २२२ वरून २०७ वर येईल आणि भाजपा १०४ आमदारांच्या जोरावर सरकार स्थापन करू शकेल. मात्र काँग्रेस आणि जेडीएस चे आमदार गैरहजर राहणार तरी कसे ? यासाठी भाजपचा काय प्लॅन आहे ? हे गुलदस्त्यात आहे.

भाजपाचं दुसरं अस्त्र आहे, ते लिंगायत सन्मानाचा मुद्दा. काँग्रेस आणि जेडीएसच्या लिंगायत आमदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांनी जोर लावला आहे. भाजपाच्या नेत्यांनी लिंगायत मठांशीही संपर्क साधल्याचं कळतं. मठांच्या माध्यमातून देखील संपर्क करण्याचे प्रयत्न होत आहेत. काँग्रेसच्या २१ आणि जेडीएसच्या १० लिंगायत आमदारांनी येडियुरप्पांना पाठिंबा द्यावा, यासाठी त्यांच्यावर भावनिक दबाव आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत.अर्थात, ही जुळवाजुळव तितकीशी सोपी नाही.

काँग्रेस-जेडीएसचे आमदार आमच्या संपर्कात असून भाजपाच सरकार स्थापन करेल, असा विश्वास येडियुरप्पा यांनी व्यक्त केला. त्यानंतर, भाजपानं आपल्या आमदारांना १०० कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा आरोप करत जेडीएस नेते कुमारस्वामींनी खळबळ उडवून दिली आहे. या शाब्दिक चकमकींनंतर, काँग्रेस आणि जेडीएस नेते ११३ आमदारांच्या समर्थनाचं पत्र घेऊन राज्यपालांच्या भेटीला गेले. स्थिर सरकार देऊ शकू इतकं संख्याबळ आपल्याकडे असल्याचा दावा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्यपाल यांचे भाजप कनेक्शन पाहता भाजपाला झुकतं माप मिळण्याची चिन्हे असल्याने अधिक सावधगिरी बाळगण्यात येत आहे. वाजपेयी यांच्या काळातला समर्थन न मिळण्याने आम्ही घोडेबाजार करणार नाही असे सांगून राजीनामा देणारे वाजपेयी आठवले, तर हाच का तो भाजप पक्ष ? अशा प्रश्न जुन्या लोकांना पडू शकतो. तशीही काँग्रेस आणि जेडीएस यांची विचारधारा भाजपपेक्षा जास्त जवळ आहे मात्र २०१८ मध्ये विचारधारेला स्थान उरले नाही हे देखील खरे.

मात्र २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत थोडा वेळ सीट ची संख्या बाजूला ठेवली तर , काँग्रेसला ३४. ८ % , जेडीएस ला १६.५ % तर भाजप ला फक्त ४६. ४ % लोकांनी पसंती दर्शविली आहे . काँग्रेसचा व जेडीएसची टक्केवारी पहिली तर ५१.३ होते . म्हणजे भाजप पेक्षा जास्त आहे मात्र सत्तेसाठी भाजप देखील इरेला पेटली असून पुढे काय होतंय कोणीच अंदाज लावू शकत नाही .

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाबली भाजपची दुखरी नस : कर्नाटक विधानसभा निवडणूक

काँग्रेस पाठोपाठ भाजपचा देखील प्लॅन बी तयार : ‘अशा’ आहेत पुढील हालचाली

हाथ में आया पर मुँह न लगा : भाजपच्या इतिहासात लिहिला जाणार ‘ हा ‘ नवीन अध्याय

कर्नाटकच्या निकालावर राज ठाकरे काय म्हणाले ? : भाजपच घोड अडलय ‘ इतक्या ‘ सीटवर

भाजपाकडून एकही मुस्लिम उमेदवार नसताना मुस्लिम समाजाचे मतदान कोणाला ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

मोदी यांच्या फेकूपणाचे नाव काय ? : दैनिक लोकमतमधून मोदी यांचे अज्ञान केले उघडे

काँग्रेसच्या इंदिरा कॅन्टीनमध्ये ताव मारुन भाजपा कार्यकर्त्यांचा प्रचार : ६० वर्षे काय केले ?

लोकनिती-सीएसडीएस एबीपी न्यूजच्या एक्सिट पोलनुसार ‘ हा ‘ पक्ष सत्तेचा दावेदार ? : कर्नाटक विधानसभा निवडणूक

भाजपचा चोरटा नगरसेवक सीसीटीव्ही मध्ये झाला कैद : कुठे घडली ही घटना ?

बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवण्याची परंपरा भाजपने राखली : लाज वाटावी ‘ असे ‘ उचलले पाऊल ?

काँग्रेसने कुत्र्यांकडून देशभक्ती शिकावी , पंतप्रधान मोदी यांची भाषा घसरली

आणि भाजपाने शहीद म्हणून गौरवलेला ‘ तो ‘कार्यकर्ता चक्क जिवंत : काय आहे बातमी ?

स्टार प्रचारक आणि संस्कारी शोकांतिका : मुकेश माचकर यांचा अप्रतिम लेख

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा