धक्कादायक ! भय्युजी महाराजांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

By | June 12, 2018

bhaiyyuji maharaj suicide in indore

आध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांनी इंदूर मध्ये आत्महत्या केली आहे. आज भय्युजींनी स्वत:वर गोळी झाडून स्वत:च जीवन संपवलं. इंदूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. त्यांनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यांना उपचारांसाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

महाराष्ट्राच्या राजकारणात भय्यूजी महाराजांचा बराच बोलबाला होता. राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जायचे. किचकट प्रश्न सोडवण्याकरता राजकीय नेते देखील भय्यूजी महाराजांना मध्यस्थीची विनंती करायचे. मराठा आरक्षणसाठीच्या मोर्चामागे भय्यूजी महाराज असल्याच्याही अनेक चर्चा होत्या . कौटुंबिक कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे . राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचे नाव मोठे होते .