भद्रकाली पोलीस आणि कापड व्यावसायिक यांच्यातील रंगलेल्या वादाची कथा

By | October 6, 2017

bhadrakali police station

नाशिक शहराला पार्किंग ची अडचण हा प्रश्न काही नवीन नाही . स्थानिक तसेच बाहेरून आलेले लोक आडव्या तिडव्या गाड्या लावून त्यात अधिक भर टाकत असतात .
मेन रोडवर पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस व कापड व्यावसायिकांमध्ये चांगलाच वाद रंगला . शेवटी पोलिसांना काही कारवाई न करताच परत फिरावे लागले .

शालिमार, मेन रोड ते रविवार कारंजांपर्यंत खरेदीसाठी आलेले लोक आपली वाहने पार्क करतात त्यात अजून भर म्हणून जास्त ग्राहक यावेत आन आपल्या दुकानाचा डिस्पले दिसावा म्हणून दुकानदार दुकानाबाहेरही लांब अंतरापर्यंत कपडे टांगून ठेवतात .

त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने भद्रकाली पोलीस पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाईसाठी गेले होते . मात्र वाहनधारक राहिले बाजूला , कापड व्यवसायिकांनीच पोलिसांना धारेवर धरले . पुढे पोलीस आणि कापड व्यावसायिक असे वादाचे स्वरूप तयार झाले . काही व्यावसायिकांनी पोलीस जातीभेद करत असल्याचा आरोप केला. शेवटी जास्त तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना मागे फिरावे लागले.

?पटलं तर लाईक करा शेअर करा ?