जगातला सर्वात मोठा २००० कोटी रुपयाचा १६ जणांचा दरोडा: वैयक्तिक भांडवल ९ कोटी

By | October 4, 2017

bank robbery 9 cr invested 600 meter long bhayyan

एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशी ही स्टोरी आहे . जर सगळे प्लॅनप्रमाणे झाले असते तर जागतिक लेव्हल वर ह्या चोरीची दाखल घेतली गेली असती आणि जगातला बॅंकेवर टाकलेला सर्वात मोठा दरोडा ठरला असता. पण पोलीस अगदी वेळेवर पोहोचले आणि प्लॅन चौपट झाला . पोलिसांना यश आलं व दरोडेखोरांना ताब्यात घेतलं. घटना ब्राझीलमध्ये घडलेली आहे.

दरोडेखोर चार महिन्यांपासून ह्या कटाची प्लांनिंग करत होते . ब्राझीलमधल्या साओ पाओलो येथील बॅंक लुटण्याचा दरोडेखोरांचा प्लॅन होता. अर्थात प्लॅन मोठा होता म्हणून त्यांनी त्यासाठी भांडवल देखील गुंतवले होते . दरोड्यासाठी त्यांनी 4 कोटी रियाल म्हणजे 1.27 मिलियन डॉलर ( 8. 26 कोटी ) रूपये स्वतः गुंतवले होते.

यासाठी 16 दरोडेखोर 4 महिन्यांपासून तयारी करत होते. आधी त्यांनी दरोड्यासाठी त्यांनी एक घर भाड्याने घेतलं. या घरातूनच त्यांनी एक भुयार खोदण्यास सुरूवात केली. 600 मीटर लांब भुयार त्यांनी बनवून सुद्धा तयार झालं होत . या भुयारातून बॅंकेच्या लॉकरपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा कट होता.भुयारात प्रकाशा यावा यासाठी लाईट ची सुविधा देखील केलेली होती याशिवाय माती पडून भुयार ब्लॉक होऊ नये यासाठी त्यांनी लोखंडाचाही सपोर्ट देण्यात आला होता.

पण ऐनवेळी पोलिसांना दरोडेखोरांच्या कटाची कुणकुण लागली आणि दरोडा टाकण्यापासून अवघ्या तासाभराच्या अंतरावर असतानाच पोलिसांनी त्यांचा प्लॅन चौपट केला . बॅंकेतून तब्बल 317 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास दोन हजार कोटी रूपये लुटण्याचा त्यांचा डाव होता. जर हा दरोडा टाकण्यात त्यांना यश आलं असतं तर तो जगातला बॅंकेवर टाकलेला सर्वात मोठा ठरला असता असं सांगितलं जात आहे.

?पोस्ट आवडली तर लाईक करा … शेअर करा ?