नाशिकमध्ये मुलींची तस्करी.. बांगलादेशी तरुणीचे पोलिसांवर धक्कादायक आरोप

By | December 15, 2017

dead body of 17 year old girl found in chakan pune

मुंबई पुणे आणि नंतर नाशिक ही झपाट्याने वाढणारी महाराष्ट्रातील शहरे असून गुन्हेगारीच्या प्रमाणामध्ये देखील नाशिकचे नाव पुढे येऊ लागले आहे . खून, चोऱ्या हे देखील आता जुने झाले मात्र नाशिकमध्ये चक्क मुलींची आणि महिलांची तस्करी होत असल्याचे आढळून आले आहे . एका बांगलादेशी तरुणीने यासंदर्भात आरोप केले आहेत . इतकेच नव्हे तर पैसे घेऊन मुलींना विकण्यात येते आणि त्यांना वेश्यावृत्तीत ढकलले जाते . तसेच पोलीस देखील पैसे घेऊन या प्रकारांकडे डोळेझाक करत असल्याचे ह्या मुलीचे म्हणणे आहे.

बांगलादेशातून तरूणींना घरकाम किंवा इतर काहीतरी लहान मोठे काम देऊ ह्या आशेने भारतात आणले जाते आणि पुढे त्यांची विक्री केली जाते. एकदा विक्री झाली त्यांना दलाल व पुढे ग्राहकांकडे सोपवले जाते व दलाल लोकांचे उखळ पांढरे केले जाते .अल्पवयीन मुली मोठ्या दिसाव्यात म्हणून अक्षरश: त्यांना हार्मोनच्या वाढीसाठी औषधे दिली जातात. असा आरोप ह्या बांगलादेशी तरूणीने केला आहे . ह्या प्रकरणामंध्ये पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे.

ह्या तरुणीचा आरोप आहे कि हिला, स्वतःच्याच मावशीने या तरूणीला भारतात फिरण्याच्या बहाण्याने आणले होते पुढे एका दलालाला विकलं. बांगलादेशातून चोरट्या मार्गाने तिला कोलकाता आणि तिथून नाशिकमध्ये आणलं गेलं. सुरूवातीला तिच्यासोबत आणखी १५ ते २० मुली होत्या. त्यांचे बनावट मतदार ओळखपत्र, इतर पुराव्याचे दाखले देखील बनवण्यात आले.

नाशिकजवळ सिन्नरच्या कुंटणखान्यात ही मुलगी पोहोचली. त्यानंतर तिला मुंबईला चार लाखांना विकण्यात आलं. तिथेदिवस रात्र तिचे शोषण केले जायचे. दरम्यान , त्यानंतर नाशिकमधल्या एका ओळखीच्या तरूणाच्या मदतीने तिने तेथून पळ काढला. दरम्यानच्या काळात या दोघांनी लग्न केलंय. मात्र आता सिन्नरमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेचे गुंड आणि मुंबईतले गुंड यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे त्या तरुणीचे म्हणणे आहे.

याबद्दल तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे तर एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तरूणीने याआधी सिन्नर पोलिसांशी संपर्क साधला होता. मात्र पोलिसांनी तिला पुन्हा कुंटणखान्यात जाण्याचा सल्ला दिल्याचा धक्कादायक आरोप ह्या तरूणीने केलाय. सिन्नर पोलिसांची ही भूमिका देखील चक्रावून टाकणारी आहे त्यामुळे त्यांचीही चौकशी सुरू झालीय. या प्रकरणात लवकरच एक मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी छापे टाकून सिन्नर एमआयडीसीत कुंटणखाना चालवणारी मंगल गंगावणे, तिचा मुलगा विशाल गंगावणे, दलाल सोनू देशमुख या तिघांना अटक केली आहे . ह्या मुलीच्या तक्रारीत तथ्य असेल तर सिन्नर पोलिसांची ही भूमिका व वर्दीवरील आणखी एक काळा डाग म्हणावे लागेल.

अश्विनी बिद्रे यांचा घातपात ? अभय कुरुंदकरांच्या घरात सापडले महिलेचे केस, रक्ताचे डाग

तब्बल ‘ दीड ‘ वर्षांपासून ह्या महिला पोलीस अधिकारी गायब : तरीसुद्धा पोलिसांचे सहकार्य नाही

सांगलीतील अनिकेत कोथळेच्या खून प्रकरणाला एक नवीन वळण : नातेवाईकांचा गंभीर आरोप

अनिकेत कोथळेच्या खुनानंतर होता ‘ याचा ‘ नंबर : कामटेचे पुढचे फसलेले टार्गेट

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?