बाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटीची वसुली जबरदस्तीने वसुली: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

By | April 19, 2018

private finance suicide case balasaheb pawar ahmednagar

नगर येथील खासगी सावकार नवनाथ वाघ याने आत्महत्या केलेले बाळासाहेब पवार यांच्याकडून जबरदस्तीने २६ मे २०१६ ते ३० मार्च २०१८ पर्यंत तब्बल ५ कोटी रुपये नेल्याचे पोलीस पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे . मात्र वसूल करून हे पैसे नवनाथ वाघ कोणाला देत होता ? याचा तपास आता पोलीस करत आहेत .
बाळासाहेब पवार यांच्या मुलीने याबद्दल तक्रार नोंदवली होती. त्यानुसार बाळासाहेब पवार यांचे मदतनीस व ह्या प्रकारातील साक्षीदार रत्नाकर ठाणगे यांचा जबाब पोलिसांनी नोंदवलेला आहे . ठाणगे यांच्या सांगण्यानुसार वाघ याने अडीच वर्षाच्या कालावधीत बाळासाहेब पवार यांच्याकडून तब्बल ५ कोटी रुपये वसूल केले होते .नवनाथ वाघ याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत २ दिवसाची वाढ करण्यात आली आहे.

  • वा रे शेतकरी सावकार

सावकार वाघ याचा व्यवसाय शेतीचा आहे . मात्र तो कोट्यवधी रुपये व्याजाने कसा काय देत होता ? हे पैसे त्याच्याकडे आले कुठून ? बाळासाहेब पवार यांना त्रास देण्यासाठी  नवनाथ वाघ याच्यापाठी करता करविता कोण होता ? याचाही तपास पोलिसांनी सुरु केला आहे . या प्रकारात सहाय्यक निरीक्षक नयन पाटील यांची नेमणूक असून अद्याप देखील आत्महत्या करण्यापूर्वी बाळासाहेब पवार यांनी लिहलेल्या चिठ्ठीचा मजकूर गुलदस्त्यात आहे .

  • काय आहे प्रकरण ?

नगरमधील ओम उद्योग समूहाचे मालक बाळासाहेब पवार यांनी ३१ मार्चला गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे . मयत पवार यांची मुलगी अमृता पवार (वय ३४) यांनी फिर्याद दाखल केलेली आहे . खासगी सावकार नवनाथ विठ्ठल वाघ (रा. बुरूडगाव ) , यशवंत कदम , विनायक रणसिंग, कटारिया जीजी (सर्वजण रा. नगर ) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून त्यातील फक्त एकाच जनास अद्याप अटक करण्यात आलेली आहे .बाळासाहेब पवार हे नगरमधील सर्वाना परिचयाचे असे व्यक्तिमत्व होते . त्यांचे ओम गार्डन मंगल कार्यालय व पुणे रोडवर (नगर शहरात ) पेट्रोल पंप आहे.

याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, उद्योग समूहाच्या विकासासाठी पवार यांनी चार खासगी सावकारांकडून पैसे घेतले आहे. या पैशाला सावकारांनी १० ते १५ टक्केपर्यंत चक्रवाढ व्याज लावले होते . पवार यांना ओम गार्डन , भुईकाटा , वॉशिंग सेंटर येथून प्रतिदिन साडेतीन लाख रुपये मिळत होते. मात्र हे पैसे सावकार पवार यांच्याकडून रोज घेऊन जात होते .

नवनाथ वाघ हा मागील एक वर्षांपासून पवार यांच्या पेट्रोल पंपावर तर कधी अरणगाव येथील शेतात येऊन त्यांच्याकडून बदनामी करणे किंवा जीवे मारण्याची धमकी देत देऊन जबरदस्तीने दररोज १ ते ३ लाख रुपये घेऊन जात होता . वाघ याच्या त्रासाला पवार कंटाळले होते . यशवंत कदम हा देखील मागील सहा महिन्यांपासून रात्री अपरात्री येऊन पवार यांच्याकडून दररोज १ लाख रुपये घेऊन जायचा. कटारिया जीजी हिला महिन्याला २ तर विनायक रणसिंग यालाही लाखात रक्कम द्यावी लागत होती . अशा सर्व सावकारांच्या व्याजाचे मिळून पवार यांना महिन्याला ७५ ते ८० लाख रुपये द्यावे लागत होते . इतर संस्थांच्या कर्जाचे हफ्ते व्यवसायातून दैनंदिन मिळणाऱ्या पैशातून देणे शक्य होते. या चार सावकारांसह इत्तर काही सावकारांनी मात्र व्याजाच्या पैशासाठी मागील एक वर्षांपासून पवार यांना त्रास दिला. हा त्रास सहन न झाल्यानेच पवार यांनी ३१ मार्च रोजी आत्महत्या केली होती .

  • खासगी सावकार भाजप आमदार शिवाजी कर्डीले आणि राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांच्या संपर्कात

दैनिक नगर सह्याद्रीच्या वृत्तानुसार, खासगी सावकार नवनाथ वाघ हा घटना घडण्यापूर्वी व घटना घटना घडल्यानंतर राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डीले यांच्या संपर्कात होता तर विनायक रणसिंग हा राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांच्या संपर्कात होता. अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे .रणसिंग हा आ. जगताप यांचा पुतण्या विकी जगतापचा सासरा आहे. आमदार अरुण जगताप यांचा मुलगा असलेला राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. .केडगावमधील शिवसैनिक हत्याकांडात त्यांचे नाव आलेलं आहे.

ओम उद्योग समूहाचे मालक बाळासाहेब पवार यांनी ३१ मार्च ला आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी त्यांनी काही लोकांची नावे लिहून ठेवली होती.पोलिसांनी चिठ्ठीतील नावांची कसून चौकशी केली असून आत्महत्या करण्यापूर्वीचे पवार याचे कॉल डिटेल्स देखील तपासण्यात येत आहेत .मात्र पुन्हा एकदा नगरच्या त्याच ३ कुटुंबाभोवतीच सगळ्या बऱ्या वाईट घटना घडतात असे समजायला हरकत नाही.

बाळासाहेब पवार यांच्या सुसाईड नोट मधील मजकूर का लपवला जातोय ?: नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बाळासाहेब पवार यांच्या पेट्रोल पंपावर कोणाचा होता डोळा ? : नगरचा बिहार करणारी नात्यागोत्याची फौज

बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांच्या नियुक्तीस ‘ ही ‘ गोष्ट अडचणीची ठरू शकते : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

रहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

‘ ह्या ‘ व्यक्तीच्या सांगण्यावरून झाली केडगावमध्ये हत्या : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नात्यागोत्यांनी एकत्र येऊन नगरमध्ये माजवलेली दहशत आणि गुंडगिरी : पत्रकार पांडुरंग बोरुडे यांचा निर्भीड लेख

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा