चक्क डझनभर बैलांची चोरी.. .बैल परस्पर विकून चोरटा झाला फरार

By | October 31, 2017

bailchori in beed person from kagal got cheated

चोर चोरी काय पद्धतीने करेल हे कोणीच सांगू शकत नाही. एका चोराने चक्क १२ बैलाचा व्यवहार काही ऍडव्हान्स देऊन घेऊन गेला. पण परत ना उरलेले पैसे भेटले ना बैल . शेवटी पोलिसात फसवणूक झाल्याचा गुन्हा नोंदवावा लागला. सध्या पोलीस ह्या बैलचोरांचा शोध घेत आहेत .

१२ बैलांची खरेदी करून तीन लाख 97 हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद कागल पोलिसांकडे दाखल झाली आहे. सत्तार युनूस पठाण (साखरवाडी, ता. केज, जि. बीड) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद अस्लम बाबालाल शेख (करनूर ता. कागल जि. कोल्हापूर ) यांनी कागल पोलिसांत दिली आहे .

सत्तार पठाण हा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी असून जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. जनावरे खरेदी-विक्रीच्या व्यवसायानिमित्त अस्लम यांच्या परिचयाचा झाला. साखर कारखाना हंगाम सुरू असल्याने बैलांची गरज असल्याचे सांगून अस्लम शेख यांच्याकडील बारा बैल खरेदी केले. यापोटी त्याने 20 हजार रुपये शेख यांना ऍडव्हान्स म्हणून दिले. उर्वरित तीन लाख 97 हजार रुपये नंतर देतो, असे सांगून तो निघून गेला. हा व्यवहार 19 ऑक्‍टोबरला झाला.

काही कालावधी उलटल्यानंतर अस्लम शेख यांनी पठाण कडे तगादा सुरु केला . आज उद्या करीत पठाणने टोलवून लावले . बरेच दिवस असे गेल्यावर पठाणकडून पैसे न मिळाल्याने अस्लम शेख यांनी त्यांचे मित्र शशिकांत घाटगे यांना बरोबर घेऊन पठाण याचे गाव गाठले; मात्र तेथे तो तेथून फरार झाला होता . मात्र अस्लमकडून नेलेले बैल इतर शेतकऱ्यांच्या दारात बांधलेले दिसून आले. तेथे चौकशी केली असता शेतकऱ्यानी ती बैले पठाणकडून खरेदी केल्याचे सांगितले. हे समजताच अस्लम बाबालाल शेख यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अस्लम शेखने कागल पोलिसांत सत्तार पठाण याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आय. एम. शिंदे तपास करीत आहेत.

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?