बच्चू कडू यांच्याबद्दल माहित नसलेल्या ११ गोष्टी

By | September 28, 2017

bachchu kadu

बच्चू कडू यांच्याबद्दल माहित नसलेल्या ११ गोष्टी ..

१. बच्चू कडू यांचे खरे नाव ओमप्रकाश बाबाराव कडू असून त्यांचा जन्म बेलोरा,ता.चांदूर बाजार जिल्हा-अमरावती येथे ५ जुलै १९७० रोजी शेतकरी कुटूंबात झाला.

२. इयत्ता नववीत असताना गावात याञेत होणारा तमाशा बंद पाडून त्यांनी गावातील तरुण पिढी बरबाद होण्यापासून वाचवली.

३. मिञाला रक्तदान करताना वजन कमी पडत असल्यामुळे खिशात दगड ठेऊन त्यांनी रक्तदान करून मिञाचा जिव वाचवला.

४. रक्तदानाचे शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार बच्चू कडू आहे.

५. त्यांच्या प्रहार संघटने मार्फत आजवर लाखाच्या वर रक्त पिशव्या दान करण्यात आल्या आहे.

६ .बच्चू कडूच्या पहिल्या निवडनुकीत प्रचारा करिता पैसा नसल्याने त्यांच्या बऱ्याच मित्रांनी घरातील दागिने मोडली , पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले. आजही बच्चू कडू त्या मित्राचा अभिमानाने उल्लेख करतात.

७ .बच्चू कडू यांनी लग्न महात्मा गांधी जयंतीला राष्ट्रगीताच्या चालीवर केले व लग्नाचा खर्च टाळून अपंगांना साहित्य वाटप करण्यात आले.

८ . शासकीय अधिकारी काम करत नसल्याचे पाहून त्यांनी या अधिकार्यांच्या कॅबिनमध्ये साप सोडणे,कार्यालयात सुतळी बोम्ब फोडणे अशी आंदोलने केली.

९ . 2004 साली अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले, आज सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार आहेत.

१० .तीन वेळा आमदार असणाऱ्या बच्चू कडू यांचे आजही स्वःताचे घर नाही,भाड्याच्या घरात ते राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे.

११ .बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी आमदारांची पगारवाढीला नाकारली होती.

?पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा ?