ब्रेकिंग न्यूज : आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा ‘ ह्या ‘ प्रकरणामध्ये

By | January 17, 2018

bachchu kadu

अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.सोबत त्यांना ६०० रुपये दंड देखील भरावा लागणार आहे . ही शिक्षा अचलपूर कोर्टाने सुनावली आहे .

मागील वर्षी चांदूर बाजारमध्ये वाहतूक पोलिस इंद्रजित चौधरी यांना आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे . त्यासंदर्भात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे . गेल्या वर्षी 24 मार्च रोजी आमदार बच्चू कडू हे परतवाडा एस टी डेपो चौकातून जात असताना त्यांना संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना तिथे अनेक खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असलेल्या दिसल्या .त्यावेळी इंद्रजित चौधरी यांना बच्चू कडू यांनी जाब विचारला. त्यातून शाब्दिक बाचाबाची झाली आणि पुढे मारामारीमध्ये याचे पर्यवसान झाले. त्यावेळी आमदार कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण केली होती असा इंद्रजित चौधरी यांचा आरोप होता व त्यातून आमदार कडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र बच्चू कडू यांनी आपल्यावरील आरोप फेटाळला आहे .पोलिसांनी नीट वाहतूक नियंत्रित न केल्यामुळे त्या परिसरात कित्येक अपघात झालेले आहेत . अशा वेळी खाजगी बसेस उभ्या होत्या म्हणून एक लोकप्रतिनिधी ह्या नात्याने मी जाब विचारला होता मात्र पोलिसांनी उद्धट उत्तरे दिली. म्हणून वादावादी झाली होती मात्र मारहाणीचा प्रकार झाला नव्हता . वाहतूक पोलिसाने कर्तव्यात कसूर केल्यानेच परिसरातील वाहतुकीचे तीन तेरा वाजले, शिवाय अनेक अपघात झाले आहेत . बाचाबाची झाल्यानंतर पोलिसाने मारहाणीची खोटी तक्रार केली, असा आरोप बच्चू कडूंनी केला आहे.

ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे अचलपूरमधून अपक्ष आमदार आहेत. प्रहार युवा संघटनेचे ते संस्थापक अध्यक्षही आहेत. युवकांचे संघटन करुन त्याद्वारे विविध विषयांवर आंदोलनं ते करतात. आपल्या साध्या राहणीमुळे आणि हटके आंदोलनांमुळे बच्चू कडू हे युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये .

युवकांना व्यसने आणि वाईट गोष्टीपासून वाचवावे यासाठी बच्चू कडू नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत . त्यामुळे बच्चू कडू यांचा जनाधार मोठा आहे .काही दिवसांपूर्वी, राज ठाकरे यांच्यावर टीका केल्याने मनसेचे जिल्हा अध्यक्ष संतोष बद्रे यांनी कडू यांना याआधी फोनवर धमकी दिली होती. त्यावेळी देखील बच्चू कडू यांनी शांत राहण्याचे आवाहन केले होते . मात्र तरीदेखील बच्चू कडू यांच्या समर्थकांनी संतोष बद्रे यांना गाठून मारहाण केली होती .

बच्चू कडू यांच्याबद्दल माहित नसलेल्या ११ गोष्टी

शिवसेनेचे वाघ विधानसभेत मांजर बनले : आ. बच्चू कडू

आता मनसे जिल्हा अध्यक्षाने खाल्ला विदर्भात मार : ‘ हे ‘ आहे कारण

फेरीवाल्यांविरोधात मनसेचे आंदोलन आता पुण्यातही : रस्त्यावर फेकून दिला परप्रांतीयांचा माल

पोस्ट आवडली तर लाईक करा .. शेअर करा