मुजोर रिक्षावाल्याची भलत्या ठिकाणी दादागिरी आली अंगलट : अक्षरश: ठेचून मारले

By | January 1, 2018

auto rickshaw driver killed by two persons due to harassment

औरंगाबादमधील रिक्षाचालकांची दादागिरी व मनमानी औरंगाबादकरांना चांगलीच परिचित आहे . मात्र ह्या रिक्षावाल्याची भलत्या ठिकाणी दादागिरी अंगलट आली आणि यात त्याला आपला जीव गमवावा लागला फिरोजखान फारूख खान( १९,रा.रोजाबाग ) असे ह्या रिक्षाचालकाचे नाव असून शेख सर्फराज शेख सांडू(१८) आणि शेख अदिल शेख रफिक (१९,दोघे रा. रोजाबाग) या दोघांनी त्याचा अक्षरश: सिमेंट गट्टूने ठेचून खून केला. मृतक व आरोपी यांची आपापसात ओळख होती मात्र आर्थिक व्यवहार व फिरोजकडून सतत केल्या जाणाऱ्या दमदाटी व पैसे हिसकावून घेण्याच्या त्रासाला वैतागून त्यांनी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत फिरोजखान हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होता. खून करणारे शेख सर्फराज व शेख आदिल हे फिरोजच्या परिचयाचे होते. मात्र फिरोज त्यांना पैशावरून सतत दमदाटी करत असे. त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेणे, शिवीगाळ करणे अशा स्वरूपाचा आरोपीना कायम त्रास देत असे. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेख सर्फराज आणि अदिल हे सलीम अली सरोवराच्या मागील बाजूला असलेल्या बाभळबंदात नशा करीत असताना तिथे फिरोज आला आणि नेहमीप्रमाणे त्याने यांना दमदाटी करायला सुरुवात केली. त्यातून वादावादीला सुरुवात झाली आणि फिरोजने सर्फराजच्या खिशातून पाचशे रूपये आणि मोबाईल हिसकावून घेऊन निघून केला तसेच जाताना सर्फराजच्या हातावर ब्लेडचा वार केला त्यामुळे सर्फराजच्या हाताला गंभीर जखम झाली. मात्र सर्फराज व आदिल त्यावेळी नशेत होते, मात्र त्यांनी त्याचवेळी फिरोजला संपवण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर त्यांनी फिरोजला एकटे गाठले व शिवीगाळ करत त्यावर हल्ला चढवला. दोघांपैकी एक जनाने फिरोजला घट्ट पकडून धरले तर दुसर्याने त्याच्या गेल्यावर ब्लेड व चाकूने सपासप वार केले. मात्र तरीदेखील फिरोज जिवंत होता त्यामुळे जवळ पडलेल्या सिमेंटच्या गट्टूने त्याच्या डोक्यावर प्रहार करण्यात आले. इतक्या जोरात प्रहार केले कि सिमेंटच्या गट्टूचे तीन तुकडे झाले. तरीदेखील फिरोज मेल्याची यांची खात्री झाली नाही, मग फिरोजचा कमरेचा बेल्ट काढून गळा आवळण्यात आला. त्यात त्याचा मृत्यू झाला. मग त्याला ओढत सलीम अली सरोवराच्या पाण्यात नेले . परत पाण्यात बुडवून मग गळ्यातल्या बेल्टच्या आधारे एका बाभळीच्या झाडाला लटकवण्यात आले.हा सर्व प्रकार करून झाल्यावर दोघे आरोपी पसार झाले.पोलिसांना ही बातमी खबऱ्याच्या मार्फत समजली व त्यांनी कारवाई करत शेख सर्फराज व शेख आदिल यांना अटक केली. सिटीचौक ठाण्यात ह्या गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे .

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

अखेर तिने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला संपवले : पुणे जिल्ह्यातील घटना

प्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?