कोरेगाव भीमाच्या दंगलीत ‘ ह्या ‘ दोघांचा सहभाग : केजरीवाल यांचा सनसनाटी आरोप

By | January 12, 2018

jignesh mevani fake popularity & sponsorships by outside countries

भीमा कोरेगाव येथे देखील भाजपा आणि आरएसएसने दंगल घडवून आणली. दोन समाजात भांडणे लावून राजकारण करण्याची भाजपची पद्धत आहे . भाजपचा इतिहास दंगलीचा आहे. भीमा कोरेगाव ची दंगल देखील भाजप व आरएसएसने घडवून आणली असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी सिंदखेडराजा इथे बोलताना केला. पुढील वर्षी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात म्हणून याकडे पहिले जात आहे . सिंदखेडराजा येथील सभेत ते बोलत होते. कायम पुराव्याची भाषा करणारे केजरीवाल यांनी हा आरोप कशाच्या आधारे केला हे मात्र स्पष्ट झाले नाही .

सभेमध्ये पुढे बोलताना ते म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हा आमचा जन्म सिद्ध अधिकार आहे. तो आम्ही मिळवणारच अशी घोषणा यावेळी ‘आप’कडून करण्यात आली. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा वसा दिल्ली सरकारने उचलला आहे. ४० हजार कोटींचे बजेट असताना आप सरकार सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देत आहे. महाराष्ट्रात मात्र 3 लाख कोटींचे बजेट असताना सरकारी शाळा विक्रीला काढल्या आहेत. फोडा आणि राज्य करा अशी नीती वापरत इंग्रजांनी भारतावर राज्य केले. त्यातून पाकिस्तानची निर्मिती झाली. भारतातील शांतता भंग करण्याचे पाकिस्ताने ७० वर्षापासूनचे स्वप्न भाजपाने अवघ्या तीन वर्षात पूर्ण केले आहे.

  • संबधित बातम्या

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत लपवलेली ‘ ही ‘ गोष्ट तुमच्या लक्षात आली का ?

जिग्नेशचे बालिश राजकारण..असे किती आले किती गेले : प्रकाश आंबेडकर

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

शिवाजी महाराजांचे नाव घेत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र, अद्याप याची अंमलबजावणी झालेली नाही. मात्र भाजपा सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. दिल्लीत सत्तेत येऊन तीन महिने झाले होते. पावसाने संपूर्ण पीक मातीमोल झालेले असताना दिल्ली सरकारने परिस्थितीची पाहणी करून अवघ्या तीन महिन्यांत हेक्टरी ५० हजारांची मदत केली. देशभरात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची गरज असल्याचे सांगत त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यायला हवे असे आवाहनही त्यांनी केले.

आम्ही सत्तेत आलो त्यावेळी दिल्लीत देशभरात सर्वात महाग वीज होती. वीज कंपनीच ऑडिट करून आता देशात सर्वात स्वस्त वीज दिल्ली सरकार देत आहे.आम आदमी पार्टीची सत्ता आली तर महाराष्ट्रात देखील हे होऊ शकते . मात्र, वीज कंपन्या आणि सरकारचे साटलोटे असल्याने सर्वसामान्य नागरिकांना वीजबिलाचा शॉक दिला जात आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला की सर्वसामान्य नागरिकांना उपचार घेणेही बजेटच्या बाहेर जाते म्हणून दिल्ली सरकारने मोफत उपचार पुरवले. हा सगळा प्रयोग महाराष्ट्रातही होऊ शकतो मात्र त्यासाठी आधी आम आदमी पक्षाला महाराष्ट्रातील सत्ता द्यायला हवी असे आवाहन देखील त्यांनी केले.

  • संबधित बातम्या

लेख नक्की वाचा : निखिल वागळे यांच्या मुलाखतीमधून कसा खोटारडेपणा आणि लपवाछपवी

तर लोकशाही न मानणाऱ्यांना सोबत घ्यायला तयार : प्रकाश आंबेडकर

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा