संपूर्ण देशभरात गाजलेल्या ‘ ह्या ‘ हत्याकांडाचा आज येणार निकाल

By | October 12, 2017

aarushi_talwar_murder case

डॉक्टर राजेश आणि नुपूर तलवार सध्या गाजियाबादच्या डासना जेलमध्ये बंद आहेत.आरुषी तलवार दांम्पत्याची एकुलती एक मुलगी होती. नोएडा जलवायू विहार एल-32 मध्ये हे कुटुंब राहत होते. 16 मे 2008 च्या सकाळी आरुषी तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली. तिची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.

तलवार यांचा नोकर हेमराज देखील दिवसापासूनच गायब असल्याने सर्वप्रथम त्याच्यावर हत्येचा संशय होता. पण दुस-या दिवशी 17 मे रोजी घराच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह सापडला. या प्रकरणात न्यायालयाने आरुषीच्या आई-वडिलांना दोषी ठरवले असले तरी, अजूनही या संपूर्ण प्रकरणाबद्दल रहस्य कायम आहे.

संपूर्ण देशभरात गाजलेल्या आरुषी आणि हेमराज हत्याकांडाचा आज अलाहाबाद उच्च न्यायालय निकाल देणार आहे. आधी सीबीआय न्यायालयाने 26 नोव्हेंबर 2013 रोजी आरुषीचे आई-वडिल राजेश आणि नुपूर तलावर यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र या निर्णया विरोधात राजेश आणि नुपूर तलवार यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आज निकाल येणार आहे.

सुरुवातीला उत्तरप्रदेश पोलिसांनी ऑनर किलिंगमधून या दोन्ही हत्या झाल्याचा निष्कर्ष काढला होता. अखेर तत्कालिन मुख्यमंत्री मायावतींनी हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवले होते एकूणच या दोन्ही हत्यांभोवती रहस्य असल्याने प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणात हे प्रकरण उचलून धरले होते.

या प्रकरणाच्या तपासात अनेक नाटयमय वळणे आली. सीबीआयच्या दोन प्रमुख अधिका-यांनी परस्परविरुद्ध निष्कर्ष काढला होता . अरुण कुमार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला. तलवार यांचा कम्पाऊंडर क्रिष्णा, शेजारच्या बंगल्यात काम करणारे दोन नोकर विजय मंडल आणि राजकुमार यांना अटक केली. त्यांची नार्को चाचणी सुद्धा झाली होती पण सीबीआयला तिघांविरोधात आरोपपत्र दाखल करता न आल्याने त्यांची सुटका झाली.

दुस-या टीमला आरुषीच्या आई-वडिलांवर संशय होता. पण सबळ पुराव्याअभावी त्यांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला. पण सीबीआयच्या विशेष न्यायालयाने हा क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावला होता . त्यामुळे आज डॉक्टर राजेश आणि नुपूर तलवार यांना आज अलाहाबाद उच्च न्यायालयकाय निकाल देते यावर देशाचे लक्ष लागून आहे.

?पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?

--Ads--

Leave a Reply