एसपी ऑफिसवर हल्ला प्रकरणी मुजोर कार्यकर्त्यांचे अटकसत्र थांबले : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

By | April 18, 2018

ahmednagar murder case of shivsainik

केडगाव दुहेरी हत्याकांड घटनेपाठोपाठ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेले अटकसत्र गेल्या दोन दिवसांपासून थांबल्याचे दिसत आहे. ह्या अटकसत्राने भल्या भल्या कार्यकर्त्यांच्या पायाखालील वाळू सरकलेली असून काहीजण नगरमधून देखील गायब झालेले आहेत तर उर्वरित पोलीस कोठडीत आहेत . मात्र गेल्या काही दिवसांपासून नगरमध्ये विना नंबर फिरणाऱ्या दुचाक्या आणि मोठ्या आवाजात धिंगाणा करत जाणाऱ्या चारचाक्या देखील गायब झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे . नगरकरांसाठी ही गोष्ट सुखावह असली तरी भविष्यात देखील पोलिसांकडून अशाच कामाची अपेक्षा नगरकर बाळगून आहेत .

केडगाव पोट निवडणुकीच्या वेळी निकालानंतर शनिवारी ७ एप्रिल रोजी सायंकाळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांची गोळी झाडून नंतर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. दरम्यान ह्या प्रकरणी काही तासात नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र आपल्या नेत्याला अटक केल्याची वार्ता नगरमध्ये झपाट्याने पसरली. नगरमध्ये जगताप, कर्डीले व कोतकर ह्या तिन्ही कुटुंबाची राजकीय सत्ता तसेच नात्यागोत्याची फौज असून, प्रत्येकाने आपापले पक्ष वाटून घेतले असले तरी वेळेला सर्व जण एक होतात हा नगरकरांचा अनुभव आहे . तो अनुभव ह्यावेळी देखील आला. राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते एसपी ऑफिसच्या बाहेर जमले व आक्रमक रूप घेत एसपी ऑफिसवर हल्ला केला व आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांच्या समोरच बाहेर उचलून नेले.

पोलीस व कार्यकर्ते यांच्यात जोरात हाणामारी झाली. आलेल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात एसपी ऑफिस ची तोडफोड केली . एसपी ऑफिसवर हल्ला पाहून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नावे शोधत कार्यकर्ते धरायला सुरुवात केली . गेली १० दिवस जवळपास हा प्रकार सुरु होता . दरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक कैलास गिरवले यांचा पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. ह्या मृत्यूसाठी पोलिसच जबाबदार असल्याचा कुटुंबाचा आरोप आहे . त्यामुळे पोलीस बॅकफूटवर आले आहेत . त्यामुळे हे अटकसत्र थांबवल्याचे बोलले जातेय, मात्र हा अर्धविरामच राहावा अशी अपेक्षा जनतेची आहे.

  • ह्या पण गोष्टीचा नगरकरांनी विचार करावा

कैलास गिरवले यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असेल तर ही बाब पोलीस खात्याला शरमेने मान घाली घालावी अशी आहे मात्र कैलास गिरवले यांच्या मृत्यूचे भांडवल करून कोणी नगरच्या पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे आणि केडगाव डबल मर्डर केस किंवा एसपी ऑफिसवर हल्ल्याचे बालंट आपल्यावर येऊ नये म्हणून डबल पॉलिटिक्स तर खेळत नाही ना ? ह्याचा देखील विचार नगरकरांनी करायला हवा. नगरची वृत्तपत्रे बहुतांश ह्याच राजकीय गोतावळ्याच्या जाहिरातीवर चालत असल्याने कदाचित इतके स्पष्ट कोणी लिहणार देखील नाही याचे नगरकरांना देखील भान आहे.

केडगाव डबल मर्डर केस किंवा एसपी ऑफिसवर हल्ल्याचे प्रकरण असो,नगरची वृत्तपत्रे पहिल्या दिवशी जितकी आक्रमक असतात तितका विषय ते पुढे नेत नाहीत . मग ही नात्यागोत्यांची दहशत आहे कि जाहिरातीचे गिफ्ट म्हणून शांत बसतात हे त्यांचे त्यांना ठाऊक .कारण संग्राम जगताप यांना अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वुई सपोर्ट संग्राम जगतापच्या जाहिराती नगरमधील बहुतांश वृत्तपत्रात छापल्या गेल्या होत्या . त्यानंतर ह्या प्रकारातील बातम्यांचे वेटेज देखील कमी झालेले नगरच्या जनतेने अनुभवले आहे .

नगरचा बिहार तर कधीच झालाय मात्र आता आम्ही सांगू त्याच बातम्या नगरच्या पेपरमध्ये देऊन नगरचा उत्तर कोरिया करणार का ? आणि नगरमधील जनतेला असेच दहशतीखाली ठेवणार आणि पोलीस मात्र सत्तेच्या पॉवरखाली कायम दाबले जाणार ? ज्योतिप्रिया सिंह यांची नगरला एसपी म्हणून बदली व्हावी ही समस्त नगरकराची इच्छा असून फडणवीस सरकार खरोखर दहशतमुक्त नगर करण्यासाठी काय पावले उचलणार हे येत्या काळात पाहावे लागेल .

रहस्यमयरीत्या डीव्हीआर गायब होण्याची घटना ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

‘ ह्या ‘ व्यक्तीच्या सांगण्यावरून झाली केडगावमध्ये हत्या : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

नात्यागोत्यांनी एकत्र येऊन नगरमध्ये माजवलेली दहशत आणि गुंडगिरी : पत्रकार पांडुरंग बोरुडे यांचा निर्भीड लेख

नगरमध्ये पोटनिवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची हत्या : काँग्रेसच्या नेत्याच्या दहशतीमुळे मृतदेह रस्त्यावर पडून

शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी ‘ ह्या ‘ प्रश्नांची उत्तरे कधी मिळतील काय ? : नगर शहर शिवसेना उपप्रमुख हत्या प्रकरण

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा