आणि अखेर शिवसेनेच्या ‘ह्या ‘ मोठ्या नेत्याची आमदारकी झाली रद्द

By | November 24, 2017

arjun-khotkars-assembly-membership-canceled-by-high-court

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आमदार अर्जुन खोतकरांची आमदारकी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी निवडणूक अर्ज वेळेत न भरल्याने त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका प्रतिस्पर्धी उमेदवार कैलाश गोरंट्याल यांनी दाखल केली होती.औरंगाबाद खंडपीठाने राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे आमदार पद अपात्र घोषित केले आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नलावडे यांनी हा आदेश सुनावला.

2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, अर्ज दाखल करण्याची वेळ निघून गेल्यानंतर खोतकर यांनी स्थानिक उपविभागीय अधिका-यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, असे याचिकाकर्ते कैलाश गोरंट्याल यांचे म्हणणे होते .अर्ज वेळ निघून गेल्यावर दाखल केल्याने ते निवडणूक लढविण्यास पात्रच नव्हते, अशी ही याचिका होती, यावर आज २४ नोव्हेंबरला न्यायालयाने हा निर्णय दिला .

मात्र,यावर एक महिन्याचा स्टे दिला असून आपण या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले आहे.
2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्यात चुरशीची लढत झाली होती. या लढतीत अर्जुन खोतकर यांचा अवघ्या 296 मतांनी विजय झाला होता. 2014 विधानसभा निकालाची आकडेवारी पाहता शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांना ४५०७८ मते तर कॉंग्रेसचे कैलास गोरंट्याल यांना 44,782 मते मिळाली होती.

अर्जुन खोतकर हे मराठवाड्यातील शिवसेनेचे मोठे नेते आहेत. जालना जिल्ह्यात अर्जुन खोतकर यांचा मोठा प्रभाव आहे . त्यामुळे मोठ्या नेत्याची आमदारकी रद्द होणे शिवसेनेला एक धक्का आहे. मात्र अर्जुन खोतकर सर्वोच्च न्यायालयात जाणार असून आता याबद्दल सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार ह्यावर देखील राजकीय वर्तुळात लक्ष लागून आहे.अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे जुने जाणते नेते असून, सध्या त्यांच्याकडे टेक्सटाईल,डेअरी व फिशरी खात्याचे मंत्री आहेत. नारायण राणे मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी मंत्रिपद भूषवले आहे.

मुख्यमंत्र्यांचा मनाचा ‘ हा ‘ दिलदार पणा उद्धव ठाकरे लक्षात ठेवतील का ?

शिवसेनेच्या ‘ ह्या ‘ मास्टरप्लॅनचा भाजपने घेतलाय धसका : शिवसेना डायरेक्ट भिडणार

‘ ह्या ‘ महत्वाच्या वेळी देखील शिवसेनेने भाजपला दाखवला ठेंगा

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?