‘म्हणून ‘ ह्या अकरावीतल्या विद्यार्थ्याने केला शिक्षकावर कोयत्याने हल्ला : वाघोलीतील घटना

By | October 6, 2017

angry student attacks teacher

पुण्यात नगर रोड येथील वाघोली परिसरात शुक्रवारी एका विद्यार्थ्याने शिक्षकांवर कोयत्याने हल्ला केला . वाडेबोल्हाई परिसरातील जोगेश्वरी माता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयात हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर विद्यार्थी फरार झाला असून लोणीकंद पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर विद्यार्थी सुनील पोपट भोर हा अकरावीमध्ये शिकत होता . मात्र रोज नवीन वेगवेगळी हेअर स्टाईल आणि हिरोगिरीचे वागणे शिक्षकांना खटकत होते . त्यामुळे दर्शन चौधरी आणि धनंजय आबनावे या शिक्षकांनी अकरावीत शिकणाऱ्या सुनील भोर या विद्यार्थ्याला खडसावले होते. सुनील भोर हा महाविद्यालयात बेशिस्तपणे वागायचा. डोक्यावरचे केस वाढवल्यामुळे दोन्ही शिक्षकांनी काही दिवसांपूर्वी त्याला समज दिली होती.

तसेच एकदा त्यांनी भर वर्गात सुनीलची खरडपट्टी काढली होती. याचाच राग सुनीलच्या मनात होता. त्यातूनच ही घटना घडल्याचे बोलले जाते.आज सकाळी प्रार्थना झाल्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात परतत असताना सुनीलने त्याच्याजवळील ऊस तोडण्याच्या कोयत्याने दर्शन चौधरी आणि धनंजय अबनावे यांच्यावर वार केले. ह्या दुर्दैवी घटनेत दोन्ही शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे .

?पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?