केळी खाल्ली म्हणून पॉप सिंगर शायमा अहमद अटकेत : काय आहे प्रकरण ?

By | November 26, 2017

album-singer-shayma-ahamad-arrested-for-eating-banana-egypt

इस्लामिक देशातील अजब गजब कानून याच्याशी आपण परिचित आहोतच . मुळातच जिथं लोकशाही नाही तिथं सर्वसामान्यांच्या मताला आणि विचाराला शून्य किंमत असणार हे जगजाहीर आहे. मात्र यातून बऱ्याच वेळा सेलेब्रिटी लोकांना टार्गेट केले जाते . जर चित्रपट, पॉप अल्बम ग्लोबल व्हावा असा वाटत असेल तर बाकी देशात आपला अल्बम आवडायला हवा यासाठी बरेच कलाकार प्रयत्न करत असतात मात्र, ते जिथे अल्बम किंवा सिनेमा बनवलाय तेथील लोकांना पचनी पडत नाही आणि कलाकारांना सॉफ्ट टार्गेट केले जाते. पाकिस्तान चित्रपट इंडस्ट्री फ्लॉप का यांचेदेखील हेच प्रमुख कारण आहे .

मात्र आता किस्सा घडलाय इजिप्त मध्ये. इजिप्तची पॉप सिंगर शायमा अहमद ठरलीये सरकार आणि लोकांचा टीकेचा बळी. ह्या गाण्यामध्ये शायमा अहमद एका शिक्षकाच्या भूमिकेत आहे आणि ती उत्तेजक पद्धतीने केळी व इतर फळे खात आहे असा सरकार व स्थानिक इजिप्तच्या लोकांचे म्हणणे आहे.
मात्र गोष्ट इतक्यावरच थांबली नाही तर , शायमा अहमदला अटक देखील करण्यात आली. तिच्यावर म्यूझिक व्हिडिओमध्ये उत्तेजक पद्धतीने केळी आणि इतर फळे खाल्ल्याचा आरोप ठेवण्यात आला.

इजिप्तची शायमा अहमद या व्हिडिओमध्ये फळ खात आहे. त्याचसोबत तरुण मुलांना वर्गात शिकवत आहे. मात्र फळे खाणे हे उत्तेजक पद्धतीने दाखवले असे सरकारचे म्हणणे आहे . मिस्त्र येथील जनता देखील सरकारच्या ह्या निर्णयाचे समर्थन करताना दिसतेय. समाजात याचा वेगळा अर्थ जात असून हा व्हिडिओ अश्लील असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

२१ वर्षीय शायमाने तिच्या या व्हिडिओसाठी माफी मागितली आहे. तिचा हा व्हिडिओ आता युट्यूबवरूनही काढून टाकण्यात आला आहे. तिला अटक करण्यात आली आहे तसेच तिच्या अनेक परफॉर्मन्सवरही बंदी आणण्यात आली आहे.आता भोग आपल्या कर्माची फळे अशा शब्दात तिची स्थानिक नागरिकांकडून खिल्ली उडवली जात आहे.अशा अनुभवावरून आपण उगीचच ह्या देशात जन्माला आलो असे देखील ह्या कलाकारांना वाटू लागल्यास नवल नाही.

संबधित बातम्या

अजब फतव्याची गजब गोष्ट : टोमॅटोचा धर्म ख्रिश्चन आणि भुकेला पती आपल्या पत्नीला खाऊ शकतो

शायमा अहमदचा अल्बम व्हिडीओ


? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?