नवाजुद्दीनचा पत्ता कट: ‘ हा ‘ अभिनेता करणार बाळासाहेबांची भूमिका

By | December 21, 2017

ajay devgn to cast in movie saheb for balasaheb thackrey character

महाराष्ट्रातील प्रत्येक लहान थोरांना परिचित असे नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे यांना ओळखत नाही असा माणूस महाराष्ट्रात शोधूनही सापडणार नाही . बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर देखील त्यांची जागा घेऊ शकेल असे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले नाही, आणि बाळासाहेबांसारखे कोणी होऊ देखील शकणार नाही. बाळासाहेब ठाकरे हे जादुई व्यक्तिमत्व होते, लहान मुलांपासून तर दिग्गज पुढाऱ्यांपर्यंत सर्व जण बाळासाहेबांना मानत असत .बाळासाहेबांच्या जीवनावर ‘साहेब ‘ हा नवीन हिंदी चित्रपट येत असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाचे लिखाण केलेले आहे.

बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाशी मिळता जुळता असा ‘सरकार’ चित्रपट आला होता. तो सुपरहिट झाला. पुढे सरकारचे दोन पार्ट आले आणि दोन्ही चित्रपट चांगले चालले. त्यात सरकारची भूमिका अमिताभ यांनी केली होती. आता ‘साहेब’ ह्या चित्रपटात बाळासाहेब यांची भूमिका अजय देवगण करणार असल्याची बातमी आहे . आधी ही भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी करणार होता पण कायतरी बिनसले व ही भूमिका अजय देवगनच्या वाट्याला आली. अर्थात अजय ह्या भूमिकेचे सोनेच करणार यात वाद नाही. आज या चित्रपटाचा लॉन्चिंग सोहळा पार पडणार आहे. अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा चित्रपट लॉन्च करण्यात येणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाचं लिखाण केलेले आहे. ‘साहेब’ असे ह्या चित्रपटाचे नाव असून हा हिंदी चित्रपट राहणार आहे .बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमार व इरफान खान यांच्या देखील नावाचा विचार झाला होता पण अजय देवगणचा लुक आणि अभिनय भूमिकेच्या जास्त जवळ जात असल्याने अजयच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त आहे . अर्थात अजय देवगण कडून याबद्दल अजून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेले नाही, अर्थात बाळासाहेबांची भूमिका वठवने हे देखील एक मोठे आव्हान असणार आहे.

अजय देवगण सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच व्यस्त आहे. तानाजी मालुसरे, रेड आणि टोटल धमाल या चित्रपटांचे शूटिंग चालू असल्याने बहुदा हे पूर्ण झाल्यावरच चित्रपटाच्या शूटिंग ला सुरुवात होईल. शिवसेना खासदार संजय राऊत यांची या चित्रपटाची कथा लिहिली असून यासाठी त्यांना चार वर्ष लागली. चित्रपटाची निर्मिती देखील त्यांचीच राहणार आहे. अभिजीत पानसे दिग्दर्शक असतील. मेनस्ट्रीममध्ये हा चित्रपट लोकप्रिय व्हावा अशी संजय राऊत यांची इच्छा आहे. याआधी संजय राऊत यांचा बाळकडू नावाचा चित्रपट आला होता. मात्र त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फक्त आवाजच वापरला होता.

गुजरातच्या निकालावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘ जळजळीत ‘ प्रतिक्रिया

रमेशभाऊंची गोल्डमॅन स्टाईल कॉपी करणाऱ्या शिवसेनेच्या गुजरातच्या उमेदवाराचे काय झाले ?

मोदींची जादू कायम : गुजरातमध्ये भाजपच तर हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेस सत्ता गमावणार

मी चहा विकला पण ………. : मोदी काँग्रेसवर भडकले

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?