तब्बल सहा राज्यात ‘ ही ‘ कंपनी करणार मोबाईल सेवा बंद : पोर्ट करून घेण्याचा ट्रायचा सल्ला

By | December 23, 2017

aircel closing mobile services in six states including maharashtra

जिओने मार्केट मध्ये प्रवेश केल्यानंतर मोठ्या मोठ्या कंपन्यांनी ह्या स्पर्धेमधून माघार घ्यायचे ठरवले आहे. जिओचे सर्वाधिक कमी रेट आणि जुन्या कंपन्यांना नवीन ग्राहक मिळवण्यासाठी असलेला संघर्ष याचा रोजमेळ साधणे दिवसेंदिवस ह्या कंपन्यासाठी अवघड होत चालले आहे. जिओचे टेलिकॉम क्षेत्रात पदार्पण झाले आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांनी देखील आपले पाय जमिनीवर आणले. हवेत तरंगणारे डेटा रेट जमिनीवर आले. लोकांचे सर्रास युट्युब वर व्हिडिओ बघायचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र जिओ ने काही कंपन्यांवर गाशा गुंडाळण्याची वेळ आणली आहे.कस्टमर म्हणून आपल्याला फायदा झाला मात्र कंपन्या डब्यात गेल्या.

याआधी टाटा टेलिकॉम व रिलायन्स कम्युनिकेशनने सेवा काही प्रमाणात बंद केल्यानंतर आता एअरसेल देखील ह्या मार्केटला काही ठिकाणी रामराम करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. एअरसेलकडून पुढच्यावर्षी 30 जानेवारीपासून मोबाइल सेवा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही एअरसेलचे सिम वापरत असाल तर लवकर पोर्ट करून घ्या. नाहीतर तुमची मोबाईल सेवा बंद होऊ शकते.

एकाच वेळी तब्बल सहा राज्यांमध्ये एअरसेलने मोबाईल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असून ३० जानेवारी नंतर तुच्या मोबाईलची रेंज गायब होऊ शकते. एअरसेलची सेवा महाराष्ट्र, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे. तुमचा नंबर पोर्ट करून घ्या अशा आशयाचे मेसेज देखील कंपनीने आपल्या ग्राहकांना पाठवले आहेत. ट्राय ने देखील एअरसेल लिमिटेड आणि डिशनेट वायरलेस लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी आपले परवाने परत केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्यामुळे जर तुम्ही एअरसेलचे ग्राहक असाल तर लवकरात लवकर आपला नंबर पोर्ट करून घ्या नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो.

अर्थात ट्रायच्या नियमानुसार, लायसन्स परत केल्याच्या तारखेनंतर ६० दिवसांत एअरसेलची सेवा बंद करण्यात येईल. हा कालावधी ३० जानेवारी रोजी संपणार असून त्याच्या आता नंबर पोर्ट करून घ्यावेत असे ट्रायने देखील सांगितले आहे . एअरसेलचे तब्बल ४० लाख कस्टमर आपल्या बाजूला ओढण्यासाठी सर्वच कंपन्यामध्ये सध्या रस्सीखेच सुरु आहे.मात्र अशा एका पाठोपाठ कंपन्या बंद पडणे हे देखील चांगले लक्षण नाहीये.

हे असेच सुरु राहिले तर , सर्वाधिक स्पर्धा असलेल्या टेलिकॉम क्षेत्रात जर अशा कंपन्या बंद पडू लागल्या तर मोजक्या कंपन्याची मक्तेदारी देशामध्ये राहू शकते. त्यामुळे पुन्हा परत एकदा काही दिवसांनी इनकमिंग साठी देखील पैसे मोजायची वेळ आली तर नवल वाटायला नको.

‘ ह्या ‘ कंपनीचे सिम असेल तर पोर्ट करून घ्या : व्हॉईस कॉलिंग बंद होणार

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

लग्नाच्या वादातून भरदिवसा तरुणीवर केले सपासप वार : तरुणीचा जागीच मृत्यू

तू मला का फसवलेस असा व्हाटसऍप संदेश टाकून तिने जीवन संपले : प्रेमप्रकरणातून केली आत्महत्या

विवाहबाह्य संबंधास अडथळा ठरणाऱ्या बायकोचा पाचव्या मजल्यावरून ढकलून खून

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?