केरळमधील लव्ह जिहादचे वारे पुणे नगरमध्ये : विकृत प्रेमवीरास पुणेमध्ये धरले

By | December 22, 2017

ahmednagar police arrest one person on love jihad case

सावेडी परिसरातील एका युवतीशी वारंवार त्रास देत तिचा पाठलाग करत त्रास देणाऱ्या सुशिक्षित प्रेमवीरास नगरच्या तोफखाना पोलिसांनी पुण्यामधून अटक केली. फैजान कलीम बागवान (रा. धरती चौक, परशा खुंट, नगर) असे ह्या आरोपीचे नाव असून याआधी देखील अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. न्यायालयामधून जामीन मिळाला कि तो परत त्रास द्यायला सुरु करायचा . याप्रकरणी पोलिसांना लव्ह जिहादचा संशय अाहे. पुण्यातून अटक केल्यावर त्याला न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर तरुणी, नगरमधील एका कॉलेज मध्ये शिक्षण घेत होती. दरम्यान फैजानशी तिची ओळख झाली. त्यानंतर फैजानने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा पाठलाग करणे , अश्शील बोलणे तसेच धमकावणे असे प्रकार त्याने सुरु केले. पुढे त्याच्या ह्या उपद्रवाबद्दल मुलीने तिच्या घरी सांगितले. मुलीच्या घरच्यांनी फैजानला व त्याच्या घरच्यांना याबद्दल सांगितले. मात्र त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही. तरुणीच्या घरी कुऱ्हाड घेऊन जाऊन त्याने तिला संपवण्याचा देखील प्रयत्न केला मात्र मग मुलीच्या घरच्यांनी त्याच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. मग तो पसार झाला .

फैजान याने आतापर्यंत चार वेळा सदर मुलीचा रस्त्यामध्ये अडवून विनयभंग केला असल्याची तक्रार आहे. याबद्दल त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल आहे. संबंधित तरुणीला शिविगाळ करणे, रस्त्यातच अडवणे अशा अनेक तक्रारी फैजनच्या विरोधात दाखल आहेत.काही तक्रारी ह्या मुलीने तर काही तिच्या पालकांनी दाखल केल्या आहेत. मात्र पोलीस मागे लागतील ह्या भीतीने तो पुण्याला पसार व्हायचा आणि थोडे दिवस गेले , कि परत मुलीला त्रास द्यायला सुरु करायचा.

ह्या वेळी तक्रार दाखल झाली, त्याने लगेच जामीन मिळावा म्हणून जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता . मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला.मग त्याने त्याने औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला. दरम्यान पोलिसांना तो पुणे इथे असल्याचे समजले, पोलिसांनी आपली टीम घेऊन पुण्यात सापळा लावून त्याला उचलले. सहायक पोलिस निरीक्षक संजय सोने, पोलिस नाईक दौंड, शिंदे, जावेद शेख, रोहकलके, बडे वाकचौरे, अभिजित आरकल यांनी ही कारवाई केली. त्याला न्यायालयात हजार केले असता त्याला ६ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतकी विस्तृत कायदे व जामीन प्रक्रियेची माहिती असणे हे निश्चितच एका वेड्या प्रेमवीराचे काम नाही, यासाठी त्याला मदत करणारे छुपे हाथ नक्कीच असावेत आणि लव्ह जिहादशी हे प्रकरण निगडित असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

देवाचे शनी शिंगणापूर गॅंगवॉरने हादरले : भर बाजारात एकाचा अमानुष खून

एकाच घरातील सासू व सुनेवर करत होता भोंदूबाबा अत्याचार :असा झाला पर्दाफाश

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजाऱ्याचे खाजगी क्षण रेकॉर्ड करून करत होता ब्लैकमेल : महाराष्ट्रातील घटना

प्रेमप्रकरणातून तरूणाचा आत्याच्या मुलीवर ब्लेडने हल्ला

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?