मनसेचे सुशांत माळवदे यांच्यानंतर दुसरा हल्ला ” यांच्यावर ” : मराठी पाट्यासाठी देत होते निवेदन

By | November 26, 2017

manse workers finally catches feriwala who attacked sushant malwade

मालाडच्या मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांच्यानंतर परत एकदा विक्रोळीतील मनसे उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचे वृत्त आहे. यात उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम आणि उपशाखाध्यक्ष जखमी झाले आहेत. विक्रोळी मधील टागोर नगरमध्ये ते मराठी पाट्याचे पत्रक दुकानदारांना देत होते . तेथील फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे.मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना निवेदन देताना मारहाण झाल्याचा दावा ढोलम यांनी केला आहे. त्या मारहाणीत ढोलम चांगलेच जखमी झाले असून, त्यांच्यावर महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या हल्ल्यात मनसेचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. काँग्रेसचा एक स्थानिक नेता अब्दुल अन्सारी याच्या इशाऱ्यावरून हा हल्ला झाला, असा आरोप मनसेने केला आहे. या प्रकारामुळे विक्रोळीत तणाव पसरला आहे.

पूर्वी मुंबईतील मालाड परिसरात मनसे विभाग प्रमुखाला फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. मालाडमधील मनसेचे विभागप्रमुख सुशांत माळवदे यांना मारहाण झाली होती.पुढे हल्लेखोरांना मनसे कार्यकर्त्यांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते .

संजय निरूपम यांनी फेरीवाल्यांच्या समर्थानात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयानंही फेटाळून लावली आहे . फेरीवाल्यांना वितरीत केलेल्या जागेतच विक्री करता येणार असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायलयानं दिला होता. त्यामुळं संजय निरुपमांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना आता मुंबई महापालिकेनं नेमून दिलेल्या जागेतच विक्री करणे बंधनकारक असणार आहे.मात्र महापालिका जागा ठरवून देत नाही, असा संजय निरुपम यांचा आरोप आहे.

एल्फिस्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी रेल्वे प्रशासनाला १५ दिवसांची मुदत दिली होती. मुदत संपल्यानंतर ठाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे स्टेशन परिसरात आंदोलन केले होते . मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे स्टेशन परिसरात असलेल्या फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली होती व विक्रीसाठीचा माल रस्त्यावर फेकून दिला होता.

मात्र , मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फेरिवाला हटाव मोहिमेच्या विरोधात आता फेरीवाले देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते आहे . याआधी देखील फेरीवाल्यानी मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांना गाठून मारहाण केली होती. डोक्यात रॉड ने मारल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे मात्र आक्रमक असून, यापुढे फेरीवाले विरुद्ध मनसे असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत .

फेरीवाल्यानी देखील एकजूट केली असून मनसेची गुंडगिरी आम्ही मोडून काढू अशी धमकी देखील दिली आहे. मनसे च्या मारहाणीला यापुढे जशास तसे उत्तर देण्याची तयारी फेरीवाल्यांनी केली आहे . राज ठाकरे यांचे कार्यकर्ते कायदा हातात घेऊन सामान्य फेरिवाल्यांवर हल्ले करीत आहेत, हे आम्ही खपवून घेणार नाही. राज ठाकरे यांच्या या बेकायदा भूमिकेला पोलीस, महापालिका, राज्य सरकार व न्यायालय सुद्धा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पाठींबा देत आहेत. त्यामुळे आम्ही येत्या 29 नोव्हेंबर रोजी आझाद मैदानात भव्य धरणे आंदोलन करणार आहोत, अशी माहिती फेरिवाला एकजूट संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरातील विविध फेरिवाला संघटनांनी एकत्रित येऊन संघर्ष समितीची स्थापना केली आहे.यातील बहुतांश सर्वच पदाधिकारी हे उत्तर भारतीयच आहेत.

यापुढील काळात कायदेशीर मार्गाने लढण्यात हित आहे. फोडले, झोपडले ,चोपले हे शब्द ऐकायला ठीक वाटत असले तरी नेते काही रस्त्यावर येत नाही . मात्र सर्वसामान्य कार्यकर्तेच आपले रक्त सांडतात आणि केसेस अंगावर घेऊन कोर्टाच्या चकरा मारत बसतात.

‘ म्हणून ‘ आम्ही मनसे सोडून शिवसेनेत : मुंबईचे ६ नगरसेवक काय म्हणतात ?

धक्कादायक: सत्ताधारी तसेच पालिका अधिकारी आणि झिरो नंबरची समांतर हफ्तेवसुली यंत्रणा

फेरीवाल्यांविरोधात मनसेचे आंदोलन आता पुण्यातही : रस्त्यावर फेकून दिला परप्रांतीयांचा माल

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?