आदित्य ठाकरे यांनी जाहीर केला सत्तेला लाथ मारण्याचा ‘ हा ‘ मुहूर्त ?

By | December 14, 2017

aditya-thackeray-says shivsena will take exit from government in next one year

आम्ही पेज वरून सांगत आलोच आहे की,शिवसेना २०१९ च्या निवडणूका जवळ आल्या कि मग सत्ता सोडणार आहे. आदित्य ठाकरे यांनी देखील आज याबद्दल नगर येथे बोलताना सूतोवाच केले. ते म्हणाले कि , एका वर्षात सत्तेला लाथ मारून शिवसेना स्वबळावर सत्तेवर येईल. सत्तेला लाथ कधी मारायची हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील. मात्र त्यानंतर तुम्ही सर्वांना एकजुटीने राहून परिवर्तन घडवून आणायचे आहे.

अर्थात २०१९ ला सत्ता सोडली कि पक्ष अंतर्गत बंडाळी थोपवता येईल आणि वरून आम्ही सत्तेला लाथ मारली अशी देखील भूमिका मांडता येईल . हा हेतू यामध्ये आहे. आदित्य ठाकरे नगर येथील सभेतमध्ये बोलत होते , ते पुढे म्हणाले , ‘ राज्यात कोठेही गेलो की विद्यार्थी प्रश्नांची निवेदने घेऊन येतात. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. त्यासाठी शिवसेनेच्या वतीने शैक्षणिक अॅप तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. न्यू आर्ट्स महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी ते नगर येथे आले होते . त्यांना बघण्यासाठी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

ते म्हणाले , ‘आम्ही सत्तेमध्ये असलो तरी पहारेकऱ्यांच्या भूमिकेत आहोत. सरकारमध्ये महिला सुरक्षित नाहीत. युवा वर्ग भरकटला गेला आहे . तसेच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. व्यापाऱ्यांचे उद्योग डबघाईला आले आहेत. नोटाबंदी, जीएसटीमुळे बाजारपेठा ओस पडू लागल्या आहेत. मग कुठं गेला विकास ?. विकासाच्या नावाखाली अनेक अनुदाने बंद केली आहेत. नोटाबंदीच्या निमित्ताने आमच्या महिलांच्या पर्सवर सरकारने दरोडा टाकला आहे. नोटाबंदीच्या काळात एकही श्रीमंत व्यक्ती रस्त्यावर दिसली नाही. काळा पैसा बाहेर निघाला नाही, पण महिलांनी बचत करून ठेवलेले पैसे काळे धन म्हणून दाखवले गेले. आता आगामी काळात हे सहन केले जाणार नाही. गुजरातमधील सभांमध्ये खुर्च्या रिकाम्या दिसतात. तसे शिवसेनेच्या कोणत्याही सभेत होत नाही.

शेतकऱ्यांसाठी ११ लाखाचा धनादेश माजी आमदार अनिल राठोड व पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना दिला. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काहीतरी विकासात्मक कामे करण्यासाठी हा धनादेश देण्यात आल्याचे समजते. सावेडीत ठाकरे यांचा रोड शो आणि सभा झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत कोणतेही भाष्य केले नाही. मात्र, भाजपवर नाव न घेता टीका केली.

सरकारमधून बाहेर पडण्याच्या इशाऱ्यांच्या शतक पूर्तीसाठी उद्धव ठाकरेंना ‘ यांच्या ‘ शुभेच्छा

गुजरातमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू : शिवसेनेकडून आश्वासनांची गुजरातमध्ये खैरात

मैं सचमुच चला जाऊंगा : हेराफेरीच्या माध्यमातून नितेश राणेंकडून शिवसेनेची खिल्ली (व्हिडिओ)

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?