पँट घातली नसल्याने ‘ ह्या ‘ बॉलीवूड अभिनेत्रीला काढले रेस्टॉरंटबाहेर

By | June 9, 2018

actress refused to enter hotel

यामी गौतम ही आपल्या फ़ेअर अन लव्हली च्या जाहिरातीने घर घरात पोहचली . आता तिची बहीण देखील बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झालेली असून ती लवकरच आपल्या नवीन चित्रपटातून पदार्पण करणार आहे . मात्र सध्या ती आता का वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आलेली आहे . बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमची बहिण सुरिली एका रेस्टॉरंटमध्ये गेली असता तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पँट घातली नसल्याचं कारण सांगत सुरिलीला रेस्टॉरंटच्या बाहेर जाण्यास सांगण्यात आलं. सुरिली आपली बहिण यामी गौतमसोबत ‘उरी’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी सेरबियामध्ये आहे. ह्या घटनेनंतर यामी गौतमने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर व्हिडीओ शेअर केला असून, आपल्या बहिणीला रेस्टॉरंटमध्ये का प्रवेश दिला नाही ? , असे विचारत तिला सांगायला सांगत आहे.

मात्र ह्या घटनेला त्यांनी फारसे महत्व न देता नेहमी बॉलीवूड सेलेब्रिटी करतात तसा कोणताही थयथयाट केला नाही . दोघी बहिणी सेरबियामध्ये मजा मस्ती करत असून आपले फोटो सोशल मीडियावर शेअऱ करत आहेत. व्हिडीओतही दोघी ही घटना मस्करीत घेत असल्याचं दिसत आहे. सुरिली राजकुमार संतोषी यांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटात रणदीप हुडा मुख्य भुमिकेत असणार आहे. आपल्या बहिणीच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटासाठी आपण प्रचंड उत्सुक असल्याचं यामीने सांगितलं होतं. चित्रपटाचं शुटिंग अद्याप सुरु झालं नसल्याने सुरिली सध्या यामीसोबत उरी चित्रपटाच्या सेटवर वेळ घालवत आहे. सुरीलीने याआधी एक पंजाबी चित्रपट केलेला असून ती तिच्या पहिल्या बॉलीवूडपटासाठी तयार झालेली आहे .

पोस्ट आवडली तर लाईक शेअर करा