हसीन जहाँने आरोप केलेल्या पाकिस्तानच्या ” तिने ” अखेर सोडले मौन : काय म्हणाली ?

By | March 19, 2018

10 things to know about mohammad shami wife

गेले काही दिवस बायकोने केलेल्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या शमीवर रोज वेगळे वेगळे आरोप होत असून ह्या सर्व आरोपांना शमीने देखील काही प्रमाणात प्रत्युत्तर दिलेले आहे. मात्र आता शमी ची ‘ ती ‘ म्हणजे पाकिस्तानी असलेली अलिश्बाने देखील ह्या वादात उडी घेतली असून आपले शमीसोबत कसे संबंध आहेत हे तिने जाहीर केले आहे . पाकिस्तानच्या अलिश्बाकडून शमी पैसे घेत असून देशाची फसवणूक करत आहे, असे आरोपही हसीनने केले होते. पण आता अलिश्बानेच आपले शामीबरोबर कसे संबंध आहेत, हे जाहीर केलं आहे. त्यामुळे हा वाद शांत होण्याऐवजी चिघळण्याचीच चिन्हे जास्त आहेत.

शमीची पत्नी हसीन जहाँ हिने शमीचे फेसबुक मेसेंजर आणि व्हॉट्सअॅपवरील चॅटिंगचे स्क्रीनशॉट शेअर करून त्याच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. ह्या आरोपामुळे शमीचे वैवाहिक जीवन धोक्यात आलं आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोशल मीडियावर शमीचे काही तरुणींसोबतचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. त्या तरुणी शमीच्या गर्लफ्रेंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यासोबतच्या अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानमधील प्रेयसीकडून शामी पैसे घेतो आणि देशाला धोका देत आहे, असा देखील गंभीर आरोप शमी ची पत्नी हसीन जहाँ हिने केला होता.

मात्र, आपल्या शामीबरोबरच्या संबंधांबद्दल अलिश्बा म्हणाली की, ” मी शमीची चाहती आहे. इंस्टाग्रॅमवर मी त्याला फॉलोदेखील करते. मी शमीला दुबईमध्ये भेटली होती. ही गोष्ट खरी आहे. पण मी त्याला एक चाहती म्हणूनच भेटली होती. मला शमीला भेटण्याची इच्छा होती. पण आम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये भेटलो नाही, तर शमीच्या बहिणीच्या घरीच भेटलो होतो. त्यामुळे शमीवर जे आरोप केले जात आहेत, बिनबुडाचे आहेत.”

अलिश्बा पुढे म्हणाली की, ” इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक सुरु असताना शमीवर काही टीका होत होती. त्यावेळी मी शमीला काही प्रश्न विचारले होते. शमीने काही काळानंतर त्या प्रश्नांवर उत्तरे दिली होती. त्यानंतर आमचा संवाद सुरु झाला. ” . अलिश्बाने मौन सोडल्याने ह्या वादात तिसऱ्या व्यक्तीने उडी घेतली असे समजायला हरकत नाही .

मोहम्मद शामीच्या पत्नीबद्दलची ‘ ही ‘ माहिती कदाचित तुम्हाला माहित नसेल

बोल्ड सीनसाठी सनी लिओनीची पहिली अट ‘ ही ‘ असते

परत एकदा सनी लिओनचे न्यूड फोटोशूट ‘ ह्या ‘ कारणासाठी

‘ म्हणून ‘ सनी लिओनी आपल्या पतीला प्रत्येक कार्यक्रमात सोबत घेऊन जाते

जर तुमच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर .. : सनी लिओनी काय म्हणते ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा