काँग्रेसचा अब्दुल अन्सारी धरला..पनवेलमध्ये फेरीवाल्यांना मारहाण : मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर

By | November 27, 2017

manse workers finally catches feriwala who attacked sushant malwade

काल दि. २६ ला संध्याकाळी मुंबईच्या विक्रोळीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना करण्यात आलेली मारहाण आणि त्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपमांनी केलेलं चिथावणीखोर ट्विटने आगीत तेल ओतण्याचेच काम केले. दरम्यान राज ठाकरे यांनी तातडीची बैठक घेऊन अधिक आक्रमक होण्याचे आदेश दिले. मला मार खाणारे कार्यकर्ते नकोत तर मार देणारे हवेत असे सांगितल्यामुळे मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी आज रौन्द्र रूप धारण करीत पनवेलमधील कामोठेमध्ये फेरीवाल्यांना मारहाण करत त्यांना हुसकावून लावलं.मनसे कार्यकर्त्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांचे स्टॉल, भाजीचे गाडेही उधळून लावले. तसंच मोठ्या प्रमाणात स्टॉलची तोडफोडही केली. या सगळ्या प्रकारामुळे कामोठे परिसरात तणावाचं वातावरण तयार झाल होत.

दरम्यान, आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी आज तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. शुक्रवारपासून मुंबईत पोलीस अधिकारी आणि महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसर्सना राज ठाकरेंच्या नावानिशी पत्र पाठवण्यात येणार आहे. फेरीवाले, मराठी पाट्या आणि बँकांमध्ये मराठी व्यवहारासाठी ही पत्रं वाटण्यात येतील. जर संबंधित अधिकाऱ्यांनी दिरंगाई दाखवली तर मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असे देखील त्यात सुचवले जाणार आहे.

दरम्यान ,मराठी पाट्या लावल्या नाही म्हणून कल्याणच्या ८२ व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु अजून बऱ्याच जणांनी पुन्हा कायदा तोडला आहे म्हणून त्यांच्यावर येत्या १५ दिवसात कडक कारवाई व्हावी , असे मनसे च्या ट्विटर हॅण्डल वरून पोस्ट करण्यात आले आहे.

कालच्या विक्रोळी मधील हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार काँग्रेसचा अब्दुल अन्सारी व आणखी एका जनास अटक करण्यात आली आहे.काल रात्री २६ ला विक्रोळी मधील टागोर नगरमध्ये मनसे उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम मराठी पाट्याचे पत्रक दुकानदारांना देत होते . तेथील फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर हल्ला केला .मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना निवेदन देताना मारहाण झाल्याचा दावा ढोलम यांनी केला आहे. त्या मारहाणीत ढोलम चांगलेच जखमी झाले असून, त्यांच्यावर महात्मा फुले रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या हल्ल्यात मनसेचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. काँग्रेसचा एक स्थानिक नेता अब्दुल अन्सारी याच्या इशाऱ्यावरून हा हल्ला झाला,असे मनसेचे म्हणणे होते. त्या अब्दुल अन्सारीस अटक करण्यात आलेली आहे.

मनसेचे सुशांत माळवदे यांच्यानंतर दुसरा हल्ला ” यांच्यावर ” : मराठी पाट्यासाठी देत होते निवेदन

धक्कादायक: सत्ताधारी तसेच पालिका अधिकारी आणि झिरो नंबरची समांतर हफ्तेवसुली यंत्रणा

फेरीवाल्यांविरोधात मनसेचे आंदोलन आता पुण्यातही : रस्त्यावर फेकून दिला परप्रांतीयांचा माल

? पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा ?