नक्षल्यांवर संक्रांत : एकाच दिवसात शहरी भागातून तब्बल ‘ इतके ‘ नक्षली एटीएसने धरले

By | January 14, 2018

jignesh mevani fake popularity & sponsorships by outside countries

महाराष्ट्र एटीएसने नक्षली संघटनेशी संबंधित असणाऱ्या 7 संशयितांना अटक केली आहे . ह्या सर्वांचा संबंध बंदी घालण्यात आलेल्या माओवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाशी असल्याचे समजते . कोरेगाव भीमा प्रकरणी देखील यांचा हात असल्याचे देखील पुरावे मिळाले आहेत त्या आधारावर अधिक चौकशीसाठी त्यांना १६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) ही संघटना नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय असल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने त्यावर बंदी घातली आहे. त्यानंतरही या संघटनेचे नक्षलवादी विविध भागात सक्रिय आहेत. मुळात नक्षलवाद्यांना लोकशाही प्रक्रियाच मान्य नाही त्यामुळे ते हिंसक कारवाया करून सतत सरकारी व्यक्तींवर तसेच सरकारी प्रॉपर्टीवर हल्ले करून आपले उपद्रवमूल्य दाखवत असतात . त्यामुळे ह्या संघटनेवर याआधी देखिल बंदी होतीच. मात्र काही काळापासून ही संघटना शहरी भागामध्ये देखील आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याचे काही पुरावे यापूर्वी पुण्यात देखील आढळून आले होते.

एटीएस पथकाला शुक्रवारी कल्याण स्टेशनवर एक नक्षलवादी कार्यकर्ता येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एटीएसच्या एका पथकाने कल्याण स्थानकात जाऊन या कार्यकर्त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरूवातीला हा व्यक्ती समाधानकारक उत्तरे देत नव्हता. मात्र, पोलीसी खाक्या दाखवताच ही व्यक्ती पोटाटासारखी बोलू लागली आणि आपल्या संबधित सहकाऱ्यांची नवे सांगितली. त्यानंतर घाटकोपरच्या कामराज नगर, रमाबाई आंबेडकर नगर आणि विक्रोळी परिसरातुन आणखी सहा जनांस अटक करण्यात आली. हे सगळेजण सीपीआय (माओ) साठी काम करत असल्याचे काही पुरावे त्यांचा घरातून जमा करण्यात आले आहेत . कोरेगाव प्रकरणाशी संबंधित अशी काही कागदपत्रे देखील मिळून आली आहेत . त्यामुळे कोरेगाव प्रकरणाशी यांचा संबध असल्याची शक्यता बळावली आहे .

सध्या काळाचौकी परिसरात या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे.. ३७ ते ४२ वर्षे वयोगटातले हे नक्षलवादी असून त्यांचे मूळगाव तेलंगण राज्यातील नलगौडा हे आहे.अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावे गुप्त ठेवण्यात आली असून, त्यापैकी काही जणांच्या अटकेसाठी सरकारने इनामही जाहीर केले होते, अशी माहिती हाती आली आहे.माओवाद्यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांमध्ये नक्षलवादी चळवळीचे पुनरुज्जीवन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. या परिसरातील औद्योगिक परिसरात आपल्या विचारसरणीचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट नक्षलवादी नेत्यांनी समोर ठेवले होते. कल्याणमधून अटक करण्यात आलेला मुख्य नक्षलवादी आणि त्याचे काही सहकारी यासाठी काम करत होते.

कोरेगाव भीमाच्या दंगलीत ‘ ह्या ‘ दोघांचा सहभाग : केजरीवाल यांचा सनसनाटी आरोप

तर लोकशाही न मानणाऱ्यांना सोबत घ्यायला तयार : प्रकाश आंबेडकर

जिग्नेशचे बालिश राजकारण..असे किती आले किती गेले : प्रकाश आंबेडकर

शिवरायांच्या महाराष्ट्रावर वाकडी नजर ठेवणाऱ्या जिग्नेश मेवानीला त्यांच्याच भाषेत उत्तर

लेख नक्की वाचा : जिग्नेश मेवाणी उमर खालेद आताच डोके का वर काढताहेत ?

पोस्ट आवडली तर लाईक करा शेअर करा